महाराष्ट्रातील पोलिस दलामध्ये विविध पदांवर जवळपास 12 हजार 538 पदांच्या भरतीसाठी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना विभागाला देण्यात आल्या आहेत. डिसेंबर अखेर ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांनी दिलं आहे. आज मंत्रालयात या संदर्भात एक बैठक पार झाली. या बैठकीस गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे, अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
कोरोना संकटाच्या काळात पोलिस विभागाने अत्यंत महत्त्वाचे कार्य केलेले आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस शिपाई वर्गातील पदांची अत्यंत आवश्यकता आहे. त्यामुळे या संवर्गातील 100 टक्के रिक्त पदे भरणे आवश्यक आहे. पोलीस शिपाई गट-क संवर्गातील 2019 या भरती वर्षात रिक्त असलेली 5 हजार 297 पदे आणि 2020 या भरती वर्षात सेवानिवृत्ती, पदोन्नती, राजीनामामुळे रिक्त होणारी पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई या संवर्गातील एकूण 6 हजार 726 पदे. तसेच मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयासाठी निर्माण करण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यातील नवनिर्मित 975 पदांपैकी पोलीस शिपाई संवर्गातील 505 अशी एकूण 12 हजार 538 पदे भरण्यात येणार आहेत, असं अनिल देशमुख यांनी यावेळी सांगितलं. (हेही वाचा - आदित्य ठाकरे यांच्याकडून अंतिम वर्षाच्या परीक्षांसदर्भातील UGC च्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल)
राज्यातील #पोलीसभरती प्रक्रियेला वेग. राज्य पोलिस दलामध्ये विविध पदांवर १२ हजार ५३८ पदांच्या भरतीसाठी तातडीने कार्यवाही करण्याच्या गृहमंत्री @AnilDeshmukhNCP यांच्या सूचना. ही प्रक्रिया डिसेंबरअखेर पूर्ण केली जाईल. २०१९ मध्ये अर्ज केलेल्यांना दिलासा देण्याबाबत कार्यवाही-गृहमंत्री pic.twitter.com/L0Pou9j4ab
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 18, 2020
दरम्यान, पोलीस शिपाई पदाची भरती प्रक्रिया लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी, कागदपत्रांची पडताळणी, अशा विविध टप्प्यावर पार पडत असल्याने ही प्रक्रिया दीर्घकाळ सुरू राहते. त्यामुळे एकाच भरती प्रक्रियेत जास्तीत जास्त पदे भरण्याबाबत विभाग विचार करत आहे, असंही यावेळी अनिल देशमुख यांनी सांगितलं.