Tata Play (PC - Facebook)

टाटा स्काय वापरकर्त्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनी चॅनल पॅकच्या किमतीत कपात करत आहे. कंपनी आपल्या वापरकर्त्यांना ओव्हर-द-टॉप (OTT) सामग्रीच्या युगात गुंतवून ठेवण्यासाठी चॅनेल बुके आणि पॅकची किंमत कमी करत आहे. मात्र, यामागे एक ट्विस्ट आहे. कारण, हे प्रत्येकाच्या बाबतीत घडणार नाही. फक्त निवडक सदस्यांना चॅनल पॅकच्या किमतीत घट पाहायला मिळेल. मग नेमके काय घडत आहे आणि टाटा प्ले ते कसे कार्यान्वित करेल? यासंदर्भाच सविस्तर जाणून घेऊयात...

सेवा अधिक परवडणारी बनवण्यासाठी, Tata Play वापरकर्त्यांसाठी गेल्या शनिवारपासून चॅनल पॅकच्या किंमती कमी करत आहे. यामुळे ग्राहकांना मासिक आधारावर 30 ते 100 रुपयांची बचत होणार आहे. (वाचा - 7th Pay Commission: खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांना होळीपूर्वी मिळणार गिफ्ट; महागाई भत्त्यात झाली 11 टक्क्यांची वाढ)

ओटीटीच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे पे-टीव्ही उद्योग अत्यंत संकटात आहे. चॅनल पॅकची किंमत कमी झाल्यास ग्राहक याकडे आकर्षित होतील, असा विश्वास टाटा प्लेचा आहे. टाटा प्लेचे सध्या 19 दशलक्ष (1.9 कोटी) सक्रिय सदस्य आहेत.

टाटा प्लेचे व्यवस्थापकीय संचालक हरित नागपाल यांनी ET ला सांगितले की, कंपनी निवडक वापरकर्त्यांसाठी पॅक आणि चॅनेलची किंमत कमी करेल. नागपाल म्हणाले की, हे अचानक घडत नाही. वापरकर्त्यांसाठी किंमतीतील बदल त्यांच्या वापर इतिहासाच्या आधारे केले जातील.