IPO | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

IPO मध्ये गुंतवणूक करणार्‍यांमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. प्रामुख्याने मुख्य बोर्ड आणि SME IPOs मध्ये गुंतवणूक करणार्‍यांमध्ये वाढ झाली आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये प्राथमिक बाजारामध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. कारण म्हणजे यावेळी पाच आयपीओ खुले होणार आहेत. सुमारे 10 कंपन्यांचे शेअर डी स्ट्रीट मध्ये पदार्पण देखील करणार आहेत. त्यामुळे तुम्ही देखील जाणून घ्या या महत्त्वाच्या आयपीओ बद्दलचे अपडेट्स.

गाला प्रिसीजन इंजीनियरिंग आईपीओ (IPO Gala Precision Engg IPO)

गाला प्रिसीजन इंजिनियरिंग चा आयपीओ 2 सप्टेंबर दिवशी उघडणार आहे. या कंपनीने 167.93 कोटी जमा करण्याची योजना आखली आहे. या आयपीओ मध्ये 26 लाख शेअर्स घेतले जाणार आहेत. 6 लाख शेअर्स ची विक्री होणार आहे. या आयपीओ ची प्राईज बॅन्ड 503 ते 529 रूपये आहे. गाला प्रिसीजन इंजिनियरिंग चे शेअर 9 सप्टेंबरला बीएसई आणि एनएसई मध्ये लिस्ट होणार आहे.

बाज़ार स्टाइल रिटेल आईपीओ (Baazar Style Retail IPO)

रेखा झुनझुनवाला द्वारा समर्थित बाजार स्टाईल रिटेल चा आयपीओ 3 सप्टेंबरला बंद होणार आहे. हा आयपीओ 834.68 कोटी जमावण्याचा प्रयत्न करत आहे. या आयपीओ ला पहिल्या दिवशी 72% सब्सस्क्रिपशन मिळाले आहे. कंपनी चे शेअर 6 सप्टेंबर ला लिस्ट होण्याचा अंदाज आहे.

जेय्यम ग्लोबल फूड्स आईपीओ (Jeyyam Global Foods IPO)

जेय्यम ग्लोबल फूड्स चा आयपीओ 2 सप्टेंबर ते 4 सप्टेंबर दरम्यान सब्सक्रिपशन साठी खुला राहणार आहे. या कंपनीने 81.94 कोटी जमा करण्याचा मानस केला आहे. याची किंमत प्रति शेअर 59 ते 61 रूपये आहे. कंपनीच्या शेअर्सला 9 सप्टेंबरला NSE SME प्लेटफॉर्म वर लिस्ट केलं जाणार आहे.

नमो ईवेस्ट मॅनेजमेंट आईपीओ (Namo eWaste Management IPO)

नमो ईवेस्ट मॅनेजमेंट आईपीओ 4 सप्टेंबरला उघडणार आहेत. हा IPO पुर्ण पणे 60.24 लाख शेअर्स फ्रेश दाखल केला जाणार आहे. त्याची प्राईज बॅन्ड 80 ते 85 प्रति शेअर ठरवण्यात आली आहे. कंपनी चे शेअर्स 11 सप्टेंबरला NSE SME प्लेटफॉर्म वर लिस्ट केले जाणार आहेत.

माच कॉन्फ्रेंसेस एंड इवेंट्स आईपीओ (Mach Conferences and Events IPO)

माच कॉन्फ्रेंसेस एंड इवेंट्स चा आयपीओ 4 सप्टेंबर ते 6 सप्टेंबर दरम्यान खुला राहणार आहे. या कंपनीच्या आयपीओ द्वारा ते 125.28 कोटी जमावण्याचं लक्ष्य आहे. त्यांचे शेअर्स 11 सप्टेंबरला BSE SME प्लेटफॉर्म वर लिस्ट केले जाणार आहेत.

माई मुद्रा फिनकॉर्प IPO (My Mudra Fincorp IPO)

माई मुद्रा फिनकॉर्प चा आयपीओ 5 सप्टेंबर ते 9 सप्टेंबर दरम्यान खुला असणार आहे. कंपनी कडून या आयपीओ द्वारा 33.26 कोटी जमा करण्याचं लक्ष्य आहे. याची प्राईज बॅन्ड 104 ते 110 रूपये प्रति शेअर आहे. या शेअर ला 12 सप्टेंबरला NSE SME प्लेटफॉर्म वर लिस्ट केले जाणार आहे.

पुढील आठवड्यामध्ये 10 आयपीओ लिस्ट केले जाणार आहेत. यामध्ये प्रिमियर एनर्जीज,ECOS (इंडिया) मोबिलिटी आणि बाजार स्टाईल सारखे मुख्य बोर्ड्सचे आयपीओ सहभागी होणार आहेत. जे 3 ते 6 सप्टेंबर दरम्यान लिस्ट होणार आहेत. आयपीओ मध्ये गुंतवणूक करणार्‍यांसाठी हा वेळ महत्त्वाचा आहे. गुंतवणूकदारांना आयपीओ मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सारी आवश्यक माहिती जाणून घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.