भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने ग्राहकांची नाराजी दूर करण्यासाठी आणि आपल्या योजना अधिक प्रभाविपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी राष्ट्रव्यापी अधिवेशन आयोजन केले आहे. हे अधिवेश 28 मेर रोजी पार पडेल. या अधिवेशनाच्या माध्यमातून 17 स्थानिक मुख्य कार्यालय (LHO) माध्यमातून 500 पेक्षाही अधिक जागांवर या अधिवेशनाचे आयोजन केले जाईल. ग्राहकांशी संपर्क साधने आणि त्यांच्याशी संवाद करणे हेच या अधिवेशनाचा मूळ उद्देश असल्याचे बँकेने म्हटले आहे.
दरम्यान, या अधिवेशनात बँकेचे विविध वरिष्ठ अदिकारीही सहभागी होणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. यात हे अधिकारी, कर्मचारी बँकेच्या ग्राहकांशी संवाद करतील. तसेच, ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी प्रयत्न करतील. बँकेच्या सेवेबद्दल ग्राहकही आपली प्रतिक्रिया देतील. एसबीआय ही आजघडीला देशातील सर्वात मोठी बँक असून, तिच्या ग्राहकांची संख्याही बरीच मोठी आहे. (हेही वाचा, खुशखबर! SBI मध्ये सुरु झाली नोकरभरती; तब्बल 15 लाखापर्यंत मिळणार पगार; जाणून घ्या पदे आणि कुठे कराल अर्ज)
महत्त्वाचे म्हणजे या अधिवेशनात ग्राहकांना वैकल्पिक बँकिंग चॅनल्स आणि Yono SBIसंदर्भातही माहिती दिली जाईल. ग्राहकांपर्यंत अधिकाधिक चांगली सेवा आणि योजना पोहोचविण्याचा प्रयत्न या अधिवेशनाच्या माध्यमातून केला जाईल.