खुशखबर! SBI मध्ये सुरु झाली नोकरभरती; तब्बल 15 लाखापर्यंत मिळणार पगार; जाणून घ्या पदे आणि कुठे कराल अर्ज
Representational Image (Photo Credits: PTI)

चला, आता लोकसभा निवडणुका संपल्या, निकाल हाती आले. नवीन सरकार आले, लवकरच मंत्रिमंडळ तयार होईल. आपणही आपल्या कामाला लागुया. देशातील बेरोजगारी हटवण्याच्या मुद्द्यावरून सुरु झालेला प्रचार  देशाला कितपत न्याय देऊ शकला हे माहित नाही, मात्र स्टेट बॅंक ऑफ इंडिया (SBI) तरुणांना नोकरीची संधी देत आहे. याबाबत एसबीआय ने अधिसूचना जारी केली असून. स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर (SO) पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांमार्फत रेग्युलर आणि कॉन्ट्रॅक्टवर उमेदवारांची निवड होणार आहे.

तपशील :

  • बँक मेडिकल ऑफिसर (BMO-II) - 56 पदे
  • व्यवस्थापक विश्लेषक - 06 पदे
  • सल्लागार निधी व्यवस्थापन – पदे

या सर्व पदांसाठी कमीत कमी 3 ते 5 वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे.

महत्वाची तारीख :

ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख - 23 मे 201 9

ऑनलाइन अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख - 12 जून 201 9

शैक्षणिक पात्रता :

मान्यताप्राप्त संस्था/ विद्यापीठ मधून एमबीबीएस/एमबीए /सीए संबंधित क्षेत्रातील पदवी.

(हेही वाचा: SBI चे ATM कार्ड अ‍ॅपच्या माध्यमातून On-Off द्वारे कंट्रोल करु शकता, तुमचे पैसे अधिक सुरक्षित राहणार)

वेतन :

निवडलेल्या उमेदवाराला 13.30 लाख ते 15.25 लाख पगार मिळण्याची शक्यता.

निवड प्रक्रिया

थेट मुलाखतीनंतर अनुभवाच्या आधारावर उमेदवार निवडले जातील.

असा करा अर्ज :

स्टेट बँक ऑफ इंडियाची अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर लॉग इन करुन तुम्ही अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला 750 अर्ज फी भरावी लागेल.