SBI SO Recruitment 2020 साठी ऑनलाईन अ‍ॅप्लिकेशन सुरू, लेखी परीक्षेशिवाय निवडले जाणार 400+ ऑफिसर्स; sbi.co.in  वर करा 13 जुलै पूर्वी अर्ज
SBI (Photo Credits: Facebook)

बॅंकिंग क्षेत्रामध्ये काम करू इच्छिणार्‍यांना आता स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये (SBI) नोकरीची संधी आहे. स्पेशॅलिस्ट केडर ऑफिसर्स (Specialist Cadre Officers)या पदासाठी ही नोकरभरती जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान ऑन्लाईन माध्यमातून इच्छुक उमेदवार यासाठी अर्ज दाखल करू शकतात. 13 जुलैपूर्वी sbi.co.in या स्टेट बॅंकेच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज दाखल करण्याची सोय आहे. दरम्यान लेखी परीक्षेशिवाय केवळ मुलाखतीवर उमेदवार निवडले जाणार असल्याने ही एक मोठी संधी आहे.

20 विविध पदांसाठी होणारी ही नोकरभरती विविध भागांमध्ये विभागली गेली आहे. एसबीआयच्या संकेत स्थळावर शैक्षणिक पात्रता, पद, वय, पगार ते अगदी आवश्यक कागदपत्र यांची सविस्तर माहिती जारी करण्यात आली आहे. या पदांच्या निवडीसाठी लेखी परीक्षा नसल्याने कागदपत्र मुलाखतीच्या वेळेस तपासले जाणार आहेत.

SBI SO Recruitment 2020 साठी अर्ज करणार्‍यांसाठी आवश्यक माहिती

  • कुठे अर्ज कराल- sbi.co.in/careers
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख - 13 जुलै, 2020
  • वयोमर्यादा- 25 ते 35 वर्ष
  • शैक्षणिक पात्रता - CA/ MBA (finance)/PGDM (finance)/PGDBM (finance)
  • फी - ST/ST/ PWD उमेदवार वगळता इतरांसाठी 750 रूपये
  • पगार - 42,020 ते 51,490 रूपये या स्केलवर इतर भत्यांसह
  • एकूण जागा - 400 पेक्षा अधिक

निवड कशी होणार?

स्पेशॅलिस्ट केडर ऑफिसर्स या पदासाठी निवड करताना लेखी परीक्षा नसेल. मात्र उमेदवाराला 100 गुणांसाठी मुलाखतीला सामोरं जावं लागेल. त्यासाठी bank.sbi/careers किंवा http://www.sbi.co.in/careers या लिकंवरून ऑनलाईन अ‍ॅप्लिकेशन केल्यानंतर उमेदवारांना दिलेला इमेल आयडी अ‍ॅक्टिव्ह ठेवणं गरजेचे आहे. त्यावर विद्यार्थ्यांना पुढील माहिती मिळणार आहे.