
एसबीआयने (SBI) आपल्या ग्राहकांसाठी गृहकर्जावरील व्याज दरात कपात केली असून आजपासून (10 एप्रिल) नवे व्याज दर लागू होणार आहे. त्याचसोबत बचत खात्यावरील व्याज दर सुद्धा बदलणार आहे. आरबीआयने रेपो रेटमध्ये कपात केल्यानंतर बँकांनी कर्जावरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
आरबीआयने काही दिवसांपूर्वीच रेपो दरात 0.25 कपात केली आहे.तर आता एका वर्षातील एमसीएलआर 8.55 टक्क्यांवरुन 8.50 टक्के होणार आहे. यामुळे गृहकर्ज, वाहनांवरील कर्ज किंवा वैयक्तिक कर्ज स्वस्त होणार आहे.(हेही वाचा-खुशखबर! आता घटणार कर्जांचे व्याजदर; रिझर्व्ह बँकेने केली रेपो दरात कपात)
30 लाख रुपयांपर्यंतच्या गृहकर्जावरील व्याज दरासाठी 0.10 टक्क्यांनी कपात केली. त्यामुळे नवा व्याज दर 8.6 टक्क्यांवरुन 8.9 टक्के होणार आहे. यापूर्वी दर 8.7 टक्क्यांहून 9 टक्क्यांपर्यंत होता. तर 1 लाख रुपयापर्यंतच्या बचत खात्यामधील ग्राहकांसाठी रक्कमेवर 3.5 टक्के व्याज दर लागू करण्यात आला आहे. तसेच 1 लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेवर 3.25 टक्क्यांनी व्याज दर 1 मे पासून लागू होणार आहेत.