RBI (File Photo)

RBI Policy: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) महत्त्वपूर्ण निर्णय घेत नागरिकांना खुशखबर दिली आहे. प्राप्त माहितीनुसार, रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 0.25 टक्क्यांची कपात केली. त्यामुळे नवे रेपो दर (Repo Rate) 6.25 टक्के इतके असतील. आरबीआयच्या या निर्णयामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज तसेच इतरही छोट्यामोठ्या कर्जांच्या व्याजदरात कपात होणार आहे. कधी इंधन दरवाढ कधी करवाढ असे महागाईचे चटके सोसणाऱ्या नागरिकांना आरबीआयच्या निर्णयामुळे चांगलाच दिलासा मिळाला आहे. दरम्यान, रिझर्व्ह बँकेने पाठीमागील 3 पॉलिसीतील रेपो दरात मात्र कोणताही बदल केला नव्हता. आता नव्या निर्णयानुसार रेपो दर 6.5 ते 6.25 टक्के झाले आहेत.

रिझर्व्ह बँकेने आर्थिक वर्ष 2020 साठी दरडोई उत्पन्नाचे लक्ष्य 7.4 टक्के इतके ठेवले आहे. रिझर्व्ह बँकेने दर घटवल्यानंतर रिवर्स रेपो रेट 6 टक्के होईल. रिझर्व्ह बँकेने आपले मत तटस्थ ठेवले आहे.मॉनिटरी पॉलिसी कमेटीच्या 6 सदस्यांपैकी 4 सदस्यांनी रेपो रेट कमी करण्याच्या बाजूने मत दिले. अर्बन कॉपोरेटिव्ह बँकेसाठी रिझर्व्ह बँकेने एक मोठी संस्था बनण्यासाठी प्रस्ताव दिला आहे. याशिवाय शेतकऱ्यांना विना तारण आता 1.6 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकणार आहे. ही मर्यादा यापूर्वी 1 लाख रुपयांपर्यंत होती. त्यात आता 60 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. (हेही वाचा, पाच लाख रुपये जिंका! SBIग्राहकासाठी मोठी संधी, कसा कराल अर्ज?)

रिझव्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी ते मार्च दरम्यान महागाई 2.8 टक्के राहिली. तर, एप्रिल ते सप्टेंबर 2019 या काळात महागाई 3.2 टक्के ते 3.4 टक्के राहण्याची शक्यात आहे.