SBI ने ग्राहकांना केलं सतर्क; इनकम टॅक्स रिफंड च्या नावाखाली 'या' SMS पासून दूर राहण्याचे आवाहन
SBI (Photo Credits-Twitter)

बॅंकांचे आणि एकूणच आर्थिक व्यवहार सुरळीत पार पडावे याकरिता ऑनलाईन बॅंकिंग़ आणि डिजिटल पेमेंटला चालना देण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. मात्र यामध्ये ग्राहकांची फसवणूक करून सायबर हल्ले करण्याचं प्रमाणही वाढलं आहे. सध्या आयटी रिफंड मिळवण्याच्या आमिष दाखवत नागरिकांना गंडा घातला जाऊ शकतो. त्यापासून सावध रहा अशा आशयाचा एक मेसेज आज स्टेट बॅंक ऑफ इंडियाकडून देण्यात आला आहे. आयकर विभाग आयटी रिफंड थेट करदात्यांच्या खात्यामध्ये जमा केला जातो. त्यामुळे फसव्या लिंक्स आणि मेसेज पासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.

एसबीआयने आयकर विभागाच्या नावाने किंवा आयटी रिफंडसाठी मेसेज पाठवले असतील तर त्यावर क्लिक करू नका, उघडू नका. तुमची माहिती अनोळखी लिंक्सवर शेअर करू नका असे सांगण्यात आले अअहेत. तसेच अशा मेसेजबाबत पोलिस किंवा सायबर क्राईममध्ये तक्रार करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

SBI बॅंक ट्वीट

काही दिवसांपूर्वी इन्कम टॅक्स विभागानेही अशाप्रकारचा एक मेसेज दिला आहे. फसव्या मेसेजपासून दूर रहा असे आवाहन भारतीय करदात्यांना करण्यात आलं आहे.