SBI चा ग्राहकांना अलर्ट; अडचणींशिवाय बँकिंग सेवांचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर करा 'हे' काम
Representational Image (Photo Credits: PTI)

महत्त्वाच्या ओळखपत्रांपैकी आधार कार्ड (Aadhaar Card) एक आहे. याशिवाय आर्थिक व्यवहार, बँकेची किंवा इतर महत्त्वाची कामे करणे शक्य नाही. त्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) ने गैरसोय टाळण्यासाठी आधार कार्ड संबंधित काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा सल्ला ग्राहकांना दिला आहे. कोणत्याही अडचणींशिवाय बँकिंग सेवांचा लाभ घेण्यासाठी हे काम करणे महत्त्वाचे असल्याचे बँकेने म्हटले आहे. (PAN-Aadhaar Linking चा आजचा शेवटचा दिवस; incometaxindiaefiling.gov.in साईट डाऊन मग SMSच्या माध्यमातून असे करा पॅन-आधार लिंक)

पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याचा सल्ला एसबीआयने आपल्या लाखो ग्राहकांना दिला आहे. यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये एसबीआयने म्हटले की, "पॅन आधारशी लिंक करा. त्यामुळे कोणतीही गैरसोय होणार नाही आणि अडचणींशिवाय बँकिंग सेवांचा आनंद घेता येईल."

SBI Tweet:

पॅन-आधार लिंक करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर आहे. या कालावधीत लिकींग न केल्यास पॅन कार्ड निष्क्रिय ठरेल. त्यामुळे पॅन कार्ड आणि आधार कार्ड जोडणे गरजेचे आहे. यापूर्वी पॅन-आधार लिंक करण्याची तारीख 30 जून  होती. त्यानंतर ही मर्यादा वाढवण्यात आली आहे. तसंच हे दोन्ही कार्ड लिंक न केल्यास कलम 234H अंतर्गत जास्तीत जास्त 1,000 रुपयांपर्यंत दंडही होऊ शकतो. दरम्यान, पॅन-आधार कार्ड लिकिंग तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करु शकता.