Sarkari Naukri Eastern Railway Apprentice Recruitment 2020:  8वी पास उमेदवारांसाठीदेखील रेल्वेत सरकारी नोकरची संधी, rrcer.com वर करा 4 एप्रिलपर्यंत अर्ज
Indian Railways | Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

सरकारी नोकरीच्या शोधात असणार्‍यांसाठी खूषखबर आहे. भारतीय रेल्वे सोबत काम करण्याची इच्छा असणार्‍यांसाठी Eastern Railway Apprentice Recruitment 2020 जाहीर करण्यात आलं आहे. रेल्वेच्या rrcer.com या संकेतस्थळावर जारी करण्यात आलेल्या नव्या नोटिफिकेशननुसार, रेल्वेमध्ये 2792 जागांवर नवी भरती जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार ही भरती हावरा, जमलपूर, पश्चिम बंगाल, मल्दा, असनसोल, जमालपूर, लिलूह येथे होणार आहे. दरम्यान यासाठी आजपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. लेट फीसह इच्छुकांना 4 एप्रिल पर्यंत अर्ज दाखल करता येतो. Sarkari Naukri LIC Recruitment 2020: एलआयसी मध्ये 218 जागांसाठी नोकरभरती; AE, AAO पदांसाठी 15 मार्च पर्यंत करू शकता licindia.in वर अर्ज

ईस्टर्न रेल्वे विभागामध्ये प्रत्येक डिव्हिजननुसार वेगवेगळ्या जागा उपलब्ध आहेत. हावरामध्ये 659 जागा आहेत. सिलदह, मल्दा मध्ये प्रत्येकी 526 व 101 जागा जागा उपलब्ध आहेत. असानसोल भागामध्ये 412, कांचरापरा मध्ये 206, लिलुआ मध्ये 204 आणि जमलपूर मध्ये 984 जणांचा समावेश आहे.

पात्रता निकष

Eastern Railway Apprentice Recruitment exam ला बसण्यासाठी 50% मार्कांसह इच्छुक उमेदवार 8वी किंवा 10वी पास असणं आवश्यक आहे.

NCVT/ SCVT ITI सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे.

उमेदवाराचं वय 15-24 वर्ष आवश्यक आहे.

शुल्क किती?

उमेदवार जर सामान्य, ओबीसी, ईब्ल्यूएस प्रवर्गातील असल्यास त्याला 100 रूपये एक्झाम फी आहे. तर SCs,STs, दिव्यांग उमेदवारांना प्रवेश शुल्क माफ आहे. सोबतच महिला उमेदवारांनादेखील फी माफ आहे.

दरम्यान इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन मोड प्रमाणेच क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड व नेट बॅंकिंगच्या माध्यमातून शुल्क भरता येऊ शकतो.