Sarkari Naukri 2020: इंडियन ऑईल मध्ये Apprentice Recruitment तर भारतीय रेल्वे मध्ये मेडिकल प्रॅक्टिशनर, नर्सिंग सुपरिटेंडेंट पदासाठी नोकरीची संधी; er.indianrailways.gov.in, rectt.in वर असा करा अर्ज
Sarkari Naukari (Photo Credits: File Image)

इंडियन ऑईल कॉर्परेशन लिमिटेडने तरूणांना Apprentice Recruitment साठी संधी दिली आहे. दरम्यान पूर्वी 25 मे पर्यंत असलेली अर्ज करण्याची डेडलाईन आता देशभरात 21 जून पर्यंत वाढवण्यात आली आहे. महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश, गुजरात मध्ये ही नोकरीची संधी असून पूर्वी 500 जागांसाठी असलेली ही संधी आता 600 जणांसाठी करण्यात आली आहे. नुकतीच इंडियन ऑईल कडून त्याची नवी जाहिरात देण्यात आली आहे. तर भारतीय रेल्वे मध्ये काम करू इच्छिणार्‍यांसाठी देखील नोकरीची नवी संधी आहे. मेडिकल प्रॅक्टिशनर, नर्सिंग सुपरिटेंडेंट पदासाठी हावडा डिव्हिजन मध्ये ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमध्ये नोकरीची संधी आहे.

IOCL Apprentice Recruitment 2020

इंडियन ऑईल कॉर्परेशन लिमिटेडने तरूणांना 21 जूनपूर्वी त्यांच्या अधिकृत संकेतस्थळ rectt.in वर अर्ज दाखल करायचे आहेत. Trade Apprentice वगळता इतर शाखांना 12 महिन्याची मुदत आहे. तर डाटा एन्ट्री ऑपरेटर आणि डाटा एन्ट्री ऑपरेटर साठी 15 महिन्यांचा कालावधी असेल. 100 मार्कांच्या परीक्षेच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. सुधारित जाहिरात पाहण्यासाठी, अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.

भारतीय रेल्वे मध्ये पॅरामेडिकल स्टाफसाठी भर्ती  

भारतीय रेल्वेने मेडिकल प्रॅक्टिशनर, नर्सिंग सुपरिटेंडेंट पदासाठी हावडा डिव्हिजन मध्ये ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमध्ये नोकरीची संधी जाहीर केली आहे. यासाठी व्हॉट्सअ‍ॅप कॉलच्या माध्यमातून इंटव्ह्यू घेतला जाणार आहे. 31 मे पर्यंत इच्छुक उमेदवारांना अर्ज करणं आवश्यक आहे. तर मुलाखत 2 जून दिवशी होणार आहे.   अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.

सध्या कोरोना व्हायरस लॉकडाऊनचा धोका पाहता प्रामुख्याने आरोग्य यंत्रणेवरील भार पाहता आरोग्य क्षेत्राक्षी निगडित व्यवसायाच्या उमेदवारांना तात्पुरत्या गरजेनुसार नोकरभरतीसाठी आवाहन केलं जातं. कमीत कमी वेळेत मोठी यंत्रणा उभी करण्यासाठी परीक्षा किंवा चाचणी, इंटरव्ह्यू ऑनलाईन माध्यमातून घेतले जात आहेत.