Sarkari Naukari: RBI ते AIIMS मध्ये नोकरीची संधी; पहा कधी,कुठे कराल अर्ज
Sarkari Naukari (Photo Credits: File Image)

कोरोना संकटकाळानंतर आता अनेकजण बेरोजगारीला सामोरे जात आहेत. पण हळूहळू अर्थव्यवस्था आणि उद्योगधंदे पुर्ववत होत असल्याने काही नोकरीच्या संधी खुल्या झाल्या आहेत. यामध्ये जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हांला रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया, एअर इंडिया ते अगदी एम्स पर्यंत काही ठिकाणी विविध पदांवर नोकरीची संधी असल्याने अर्ज करता येऊ शकतात. सरकारी नोकरी सुरक्षित असल्याने अनेकांचा त्याकडे कल असतो त्यामुळे तुम्ही देखील सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर पहा कोणकोणत्या पदावर आणि कधी पर्यंत तुम्ही करू शकता अर्ज. Indian Army GD Constable Recruitment 2021: 8वी ते 12वी पास तरूणांना सैन्य दलात सरकारी नोकरीची संधी; 5 मार्च पर्यंत करा अर्ज.

सरकारी नोकरी मध्ये उत्तम पगार, कामाच्या वेळा, हक्काची सुट्टी आणि कामाची सुरक्षितता असल्याने अनेक जण सरकारी नोकरी मिळाली तर बरी असे म्हणतात. सध्या भारत सरकार कडून अनेक विभागांमध्ये आऊट सोर्सिंग सुरू केले आहे त्यामुळे तुम्ही अर्ज करताना त्याचे निकष, अटी शर्थी नीट वाचूनच अर्ज करायला विसरू नका.

  • एम्स

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, गोरखपुर मध्ये 27 प्रोफेसर, 19 अतिरिक्त प्रोफेसर, 29 एसोसिएट प्रोफेसर आणि 19 सहायक प्रोफेसर यापदांसाठी नोकर भरती आहे. अधिकमाहितीसाठी तुम्ही अधिकृट संकेतस्थळ ला भेट देऊ शकता.

वेबसाइट : www.aiimsgorakhpur.edu.in   

  • आरबीआय

रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया मध्ये विविध झोन मध्ये सिव्हिल इंजिनियर पदासाठी नोकरभरती होणार आहे. 15 फेब्रुवारीपर्यंत इच्छूक उमेदवारांना आपले अर्ज दाखल करायचे आहेत. याकरिता www.rbi.org.in वर तुम्हांला भेट देऊन अधिक तपशील पाहता येतील.

वेबसाइट: www.rbi.org.in

  • भारतीय प्रौद्योगिकी संस्थान, कानपुर

भारतीय प्रौद्योगिकी संस्थान, कानपुर मध्ये 15 मार्च 2021 पर्यंत तुम्ही अनुसंधान प्रतिष्ठान अधिकारी ग्रेड I या पदासाठी अर्ज करता येणार आहे.

वेबसाइट: www.iitk.ac.in

एयर इंडिया एक्सप्रेस लिमिटेड

एयर इंडिया एक्सप्रेस लिमिटेड मध्ये डेप्युटी मॅनेजर, एयरपोर्ट सर्विसेज प्रोफाइल सिस्टम एडमिन डीसीएस ग्रेड एम 3 कोच्चि मध्ये नोकरभरती होणार आहे.

वेबसाइट: www.airindiaexpress.in

  • सेल्युलर आणि आण्विक जीव विज्ञान केंद्र

सेल्युलर आणि आण्विक जीव विज्ञान केंद्र यामध्ये ग्रेड II टेक्निशन पदासाठी नोकरभरती केली जाणार आहे. दरम्यान 8 मार्च पर्यंत त्यासाठी अर्ज करता येणार आहे.

  • मालवीय राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान, जयपुर

मालवीय राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान, जयपुर मध्ये ऑफिस अटेंडंट ते लॅब अटेडंट ते कनिष्ठ, वरिष्ठ सहाय्यक या पदांसाठी नोकरभरती होणार आहे. 5 मार्च 2021 पर्यंत तुम्ही त्यासाठी अर्ज करू शकणार आहात.

  • सीएसआईआर

सीएसआईआर मध्ये सायंटिस्ट या पदासाठी नोकर भरती होणार आहे. दरम्यान त्यासाठी आज 15 फेब्रुवारी हा अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे.

वेबसाइट : www.csir.res.in

 

भारतामध्ये शिक्षित तरूणांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासोबतच मजुरांच्या, स्किल लेबर्सना देखील काम करता यावं म्हणून चॅटबोट्सच्या माध्यमातून अवघ्या एक क्लिकवर नोकरीची संधी आणि त्याची माहिती मिळू शकेल यासाठी सरकारकडून खास व्हॉट्सअ‍ॅप नंबर अ‍ॅक्टिव्हेट करण्यात आली आहे.