Job (Photo Credits: File Image)

8 वी ते 12 वी पास तरूणांसाठी इंडियन आर्मी (Indian Army) मध्ये सरकारी नोकरीची संधी आहे. त्यामुळे तुम्हांलाही सैन्य दलामध्ये सहभागी होत देशातील लष्करासाठी काम करायचं स्वप्न असेल तर इंदौर, उज्जैन, धार, देवास, अगर मालवा, अलीराजपुर, बरवानी, बुरहानपुर, खांडवा, खरगौन, मंदसौर, नीमच, रतलाम, शाजापुर मधील तरूणांना एक मोठी संधी खुणावत आहे. दरम्यान या नोकरभरतीसाठी अधिक माहिती तुम्हांला joinindianarmy.nic.in वर मिळू शकेल.

8वी, 10वी आणि 12 वी उत्तीर्ण विद्यार्थी त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार विविध पदांवर नोकरीसाठी अर्ज करू शकतात. दरम्यान पदांच्या अनुषंगाने विविध पदांपदांसाठी विविध वयोमर्यादा ठरवण्यात आली आहे. शिपाई पदावर असणार्‍यासाठी किमान 17.5 वर्ष ते कमाल 21 वर्ष आवश्यक आहे. तर शिपाई क्लार्क, स्टोअर कीपर एक्निकल पदासाठी किमान 17.5 ते कमाल 23 वय आवश्यक आहे.

मध्य प्रदेशच्या तरूणांना या नोकरभरती मध्ये सहभागी होताना त्यंच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट आवश्यक आहे. उमेदवारांची निवड शारिरीक परीक्षा, लेखी परीक्षा यांच्या माध्यमातून होणार आहे. लेखी परीक्षेमध्ये निगेटीव्ह मार्किंग सिस्टम देखील असेल. दरम्यान ही नोकर भरती शिपाई जिडी, शिपाई जीडी (एसटी उमेदवार), शिपाई क्लार्क, स्टोअर कीपर टेक्निशिअन, शिपाई नर्सिंग असिस्टंट, शिपाई ट्रेड्समॅन आदी पदांवर होईल. (हे देखील नक्की वाचा: Central Railway Recruitment 2021: अपरेंटिच्या 2500 पदांसाठी नोकरीची संधी, जाणून घ्या अर्ज प्रक्रियेबद्दल अधिक).

लष्करासोबत सेवा करण्यासाठी इच्छुक उमेदवारांना 5 मार्च पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करायचे आहे. कुशाभाऊ ठाकरे स्टेडियम वर 20-30 मार्च दरम्यान भरती रॅलीचं देखील आयोजन करण्यात आले आहे.