Central Railway Recruitment 2021: जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण मध्य रेल्वेच्या रेक्रुटमेंट बोर्डाने अपरेंटिसच्या पदासाठी नोकर भरती करण्यासंदर्भात एक नोटीस जाहीर केली आहे. या अंतर्गत मुंबई, भुसावळ, पुणे, नागपूर आणि सोलापूरसह अन्य काही ठिकाणी नोकर भरती होणार आहे.यासाठी एकूण 2500 पद रिक्त रिक्त असून उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट https://www.rrccr.com/Home येथे भेट देत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा असे सांगण्यात आले आहे.
अर्ज करताना उमेदवारांनी लक्षात ठेवावे की, फॉर्म आधी व्यवस्थितीत वाचावा. कारण त्यात काही त्रुटी आढळल्यास त्या उमेदवाराचा अर्ज मान्य केला जाणार नाही आहे. या नोकर भरतीसाठी उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त संस्थेतून 10 परीक्षेत कमीतकमी 50 टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराचे वय 15 ते 24 दरम्यान असणे गरजेचे आहे. परंतु राखीव वर्गासाठी वयोगटासाठी सूट दिली जाणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 100 रुपये शुल्क भरावे लागणार आहेत.(BHEL मध्ये 330 जागांवर इंटरनशीपची संधी, दहावी पास उमेदवार करु शकतात अर्ज)
नोकर भरती संदर्भातील महत्वाची माहिती:
>>सोलापूर
-कॅरेज आणि वॅगन डेपोसाठी 58 रिक्त पद
-कुर्दुवाडी कार्यशाळेसाठी 21 पद
>>पुणे
-कॅरेज आणि वॅगन डेपोसाठी 31 रिक्त पद
-डिझेल लोको शेड मध्ये 121 पद
>>नागपूर
-इलेक्ट्रिक लोको शेड मध्ये 48 पद
-अजनी कॅरेज अॅन्ड वॅगन डेपोत 66 पद
या नोकर भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड ही 10 वी मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारावर केली जाणार आहे. या व्यतिरिक्त उमेदवारांनी लक्षात ठेवावे की, त्यांनी जरी उच्च शिक्षणाची पदवी जरी मिळवली असली तरीही त्यांची निवड 10 वी च्या गुणांवर होणार आहे. तसेच शिक्षणासंदर्भातील अटीबद्दल अधिक माहितीसाठी उमेदवारांनी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.