GST PTI

Rule Changes From May 1: आजपासून (1 मे) देशभरातील आर्थिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण नियम लागू होत आहेत. हे नियम तुमच्या आर्थिक आरोग्यावर थेट परिणाम करू शकतात. नियमातील सर्वात मोठा बदल जीएसटीशी संबंधित आहे. नवीन नियमांनुसार, 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या कंपन्यांनी त्यांच्या व्यवहाराच्या पावत्या 7 दिवसांच्या आत इनव्हॉइस नोंदणी पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक आहे. या श्रेणीतील करदात्यांना अहवाल दिल्याच्या तारखेला 7 दिवसांपेक्षा जुन्या चलनांची तक्रार करण्याची परवानगी दिली जाणार नाही.

म्युच्युअल फंड

बाजार नियामक सेबीने अशी विनंती केली आहे की म्युच्युअल फंड कंपन्यांनी हे सुनिश्चित करावे की गुंतवणूकदार केवळ केवायसीसह ई-वॉलेटद्वारे म्युच्युअल फंड खरेदी करतात. हा नवीन नियम 1 मे पासून लागू झाल्यानंतर गुंतवणूकदार केवळ केवायसीसह (पॅन क्रमांक, मोबाईल नंबर आणि बँक तपशील) ई-वॉलेटद्वारे गुंतवणूक करू शकतील. तुमच्या वॉलेटमध्ये केवायसी नसेल तर तुम्ही ते वापरून गुंतवणूक करू शकणार नाही.

व्यावसायिक एलपीजी सिंलिंडर दरात कपात

व्यावसायिक एलपीजी सिलिंडर (Commercial LPG Cylinder Prices) ग्राहकांना तेल आणि विपणन कंपन्यांनी दिलासा दिला आहे. या कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडर(Commercial LPG Cylinders Rates) दरात 171.50 रुपयांची कपात केली आहे. दरम्यान, व्यावसायिक एलजपीजी सिलिंडर दरात कपात करण्यात आली असली तही घरगुती सिलिंडर दरात मात्र कोणत्याही प्रकारची कपात करण्यात आली नाही.

MMMOCL

मुंबई मेट्रो लाइन्स 2A आणि 7 ने 1 मे पासून ज्येष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती आणि इयत्ता 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी 25 टक्के भाडे कपात जाहीर केली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDAA) आणि महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (MMMOCL) या लाईन्स चालवतात. याचा लाभ घेण्यासाठी, आपण आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.