31 डिसेंबर पूर्वीच क्रेडिट, डेबिट कार्ड्स Magnetic Stripe Cards ऐवजी EMV chip युक्त करा अन्यथा ATM मधून पैसे काढणं विसरा!
एटीएम कार्ड (Photo Credit- PTI)

डेबिट (Debit Card) किंवा क्रेडिट कार्डच्या (Credit Cards) क्लोनिंगमुळे अनेक ग्राहकांना आर्थिक फटका बसल्याच्या, आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यावर चाप बसवण्यासाठी आता क्रेडिट आणि डेबिट कार्ड्स Magnetic Stripe Cards ऐवजी EMV chip युक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरबीआय (RBI)  ने देशभरातील साऱ्या बँकांना कार्ड बदलण्याच्या सूचना दिल्या आहेत. 2015 सालीच याची अधिसूचना देण्यात आली होती. त्यामुळे तुमच्याकडे अजूनही जुनेच कार्ड असल्यास 31 डिसेंबरपूर्वी ते बदलण्यासाठी बँकेमध्ये अर्ज करणे आवश्यक आहे. अन्यथा नववर्षात एटीमद्वारा (ATM)  पैसे काढणं तुम्हाला कठीण होऊ शकतं.

31 डिसेंबर पूर्वीच या गोष्टी तपासून पहा -

तुम्ही वापरत असलेलं क्रेडिट किंवा डेबिट कार्ड Magnetic Stripe Card आहे का ? ते तपासून पहा. असल्यास ताबडतोब बँकेमध्ये जाऊन नव्या कार्डासाठी मागणी करा.

magnetic stripe card बदलून EMV chip युक्त कार्ड करण्याची सेवा देशभरातील साऱ्या बँकांमध्ये मोफत आहे.

बँकेमध्ये जाऊन किंवा इंटरनेट बँकेच्या माध्यमातून तुम्ही नवं कार्ड मागू शकता. पहा नेट बँकिंगद्वारा कसं अप्लाय कराल नवं कार्ड 

EMV chip युक्त कार्ड कसं ओळखाल?

EMV chip युक्त कार्डमध्ये तुमच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डाच्या डाव्या बाजूला सिम कार्डाप्रमाणे एक चिप असल्यास ते कार्ड पुढील आर्थिक व्यवहार करण्यासाठी सुरक्षित आहे.

जुन्या कार्डमध्ये चिप प्रमाणे तुम्हांला काहीच दिसणार नाही. त्यामध्ये केवळ कार्डाच्या पुढील किंवा मागील भागावर चंदेरी रंगाची चौकट असेल.

तुमचं कार्ड 2008 च्या आधी तुम्हाला मिळालं असेल तर ते जुनं Magnetic Stripe Card असण्याची शक्यता आहे. ते बदलून घेणं गरजेचे आहे.

नव्या EMV चिप कार्डच्या डेबिट आणि क्रेडीट कार्डमध्ये एक लहानशी चीप असेल. ज्यात तुमच्या अकाऊंटची पूर्ण माहिती असेल. ही माहिती इनक्रिप्टेड असेल. त्यामुळे यातील डेटा चोरीपासून सुरक्षित राहील.