Reliance Jio ग्राहकांना इतर टेलिकॉम नेटवर्कवर कॉल करण्यासाठी आता भरावे लागणार 6 पैसे/ मिनिट; वाचा संपूर्ण माहिती
Reliance Jio (Photo Credits: Facebook)

देशाचे सर्वात मोठे टेलिकॉम नेटवर्क रिलायन्स जिओ यांनी आज जाहीर केल्यानुसार जिओ ग्राहकांना आता इतर टेलिकॉम नेटवर्कवर कॉल करण्यासाठी 6 पैसे/ मिनिट दराने भरावे लागणार आहेत. पण याचीच नुकसान भरपाई म्हणून जिओने ग्राहकांना तेवढ्याच दराचा डेटा फ्री द्यायचे ठरवले आहे.

त्यामुळे उद्यापासून (ऑक्टोबर 10) जिओ ग्राहकांना इतर टेलिकॉम नेटवर्कवर कॉल करायचे असल्यास एक वेगळे IUC टॉप-अप व्हाउचर खरेदी करावे लागणार आहे.

नक्की वाचा: Reliance Jio Fiber Broadband Offer: जिओ फायबरची बंपर ऑफर, मोफत LED TV सोबत आणखी काय काय मिळतंय? पाहा सविस्तर

त्याचे दर व त्यावर मिळणारा फ्री डेटा पुढील प्रमाणे असतील

10 रुपयांच्या व्हाउचरवर 124 मिनिटे नॉन-जीओ नेटवर्कवर बोलता येईल व 1 जी बी फ्री डेटा मिळेल. तसेच 20 रुपयांच्या व्हाउचरवर 249 मिनिटे नॉन-जीओ नेटवर्कवर बोलता येईल व 2 जी बी फ्री डेटा मिळेल. आणि 50 रुपयांचा व्हाउचर खरेदी केल्यास 656 मिनिटे नॉन-जीओ नेटवर्कवर बोलता येईल व 5 जी बी फ्री डेटा मिळेल. अजून एक पर्याय म्हणजे 100 रुपयांच्या व्हाउचरवर 1362 मिनिटे नॉन-जीओ नेटवर्कवर बोलता येईल व 10 जी बी फ्री डेटा मिळेल.