फळ हा एक मानवी जीवनातला अविभाज्य आहार. मानवी शरीराला आणि आरोग्याला पोषक असे सर्व घटक फळांमधून मिळत असतात. खास करून फायबर, व्हिटॅमिन आणि पाणी आदि. थोड्याफार फरकाने सर्व प्रकारची सर्व फळे जगभरातील सर्वच देशांमध्ये मिळत असतात. पण, काही फळांचे वैशिष्ट्य असे की, ही फळे केवळ त्या त्या भौगोलिक स्थानानुसार त्या त्या देश, किंवा प्रदेशातच मिळतात. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत केवळ, भारताशिवय जगभरात कुठेच न मिळणाऱ्या दुर्मिळ फळांविषयी.
जंगली जलेबी / कोडुक्कापुली (कैमाचाइल):
हे फळ दिसायला जिलेबी किंवा एखाद्या गोल मिठाईसारखे दिसते. म्हणून या फळाला जंगली जिलेबी (कूडक्ककपुली) असेही म्हटले जाते. हिरट-गुलाबी रंगाचे हे फळ अगदी मोठे असते. गोड आणि भरपूर गर असलेले असे हे फळ आहे. यात 6 ते 10 इतक्या संख्येपर्यंत काळे चमकदार बी असते. हे फळ कच्चेही खाता येते किंवा त्याचा रसही बनवता येतो.
कॅरंबोला (स्टार फ्रूड):
अत्यंत मऊ आणि मुलायम सालीचे अवरण लाभलेले हे फळ अत्यंत देखणे दिसते. तुम्हाला जर विविध फळांची लोणची बनवून खायला आवडत असतील तर हे फळ अत्यंत चांगला पर्याय आहे. हे फळ जेव्हा कच्चे असते तेव्हा हिरव्या रंगाचे असते. चवीला हे फळ काहीसे तुरट असे असते. पण, ही फळ पूर्ण पिकल्यानंतर चविला गोड लागते. पूर्ण पिकलेले हे फळ पीवळ्या रंगाचे असते. हे फळ भारताच्या जवळपास सर्व राज्यांमध्ये पहायला मिळते.
बुद्धाज हँड (फिंगर्ड साईट्रॉन):
साधारण लिंबासारखे दिसत असलेले हे फळही चवीला गोड असते. हे फळ दिसायला मानसांच्या हाताच्या बोटांसारखे असेते. हे एक सुगंधीत फळ आहे. हे फळ चवीला काहीसे तुरट लागते. काही अभ्यासकांचा दावा आहे की, साधारण इसवीसन 400 च्या दरम्यान, बौद्ध भिक्कू हे फळ आपल्यासोबत चीनमध्ये घेऊन गेले. उत्तर पूर्व भारतात हे फळ अधिक प्रमाणात दिसते.
मंगस्तान (मंगोस्टीन) :
हे उष्णकटिबंधीय फळ आहे. दक्षिण भारतात हे फळ प्रामुख्याने आढळते. वांगी किंवा साधारण मरून रंगात दिसणाऱ्या या फळाचा गर हा बर्फाच्या गोळ्यासारखा पांढरा असतो.