Ayodhya Ram Mandir Bhumi Pujan: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्या राम मंदिर भूमिपूजन सोहळा संपन्न; चांदीची वीट रचून मोदींनी केली रामजन्मभूमीची पायाभरणी
Ayodhya Ram Mandir Bhumi Pujan (Photo Credits: ANI/Twitter)

संपूर्ण भारत ज्या दिवसाकडे डोळे लावून बसला होता तो ऐतिहासिक दिवस आज उजाडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते अयोध्या नगरीत राम लल्ला च्या मंदिराचा (Ayodhya Ram Mandir Bhumi Pujan) भूमिपूजन सोहळा संपन्न सोहळा. 175 निमंत्रितांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. मंत्रांच्या उद्घोषात नरेंद्र मोदीच्या हस्ते रचली गेली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आरएसएस प्रमुख मोहन भागवत हे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते. तर भूमिपूजन कार्यक्रमादरम्यान मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath), मोहन भागवत (Mohan Bhagwat), उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे चेअरमन महंत नृत्य गोपाल दास उपस्थित होते.

सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करुन यथासांग पूजा करण्यात आली. मुख्य भूमिपूजनाच्या मुख्य सोहळ्याला सुरुवात करण्यापूर्वी पंडितांच्या मंत्रोच्चाराच्या गजरात कलशाचे पूजन करण्यात आले. राम मंदिरासाठी 9 शिळांचं मोदींच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर चांदीची वीट रचून मोदींनी रामजन्मभूमीची पायाभरणी केली. या पायाभरणीसाठी देशभरातून 2 लाख 75 हजार वीटा आल्या. त्यातील निवडक 100 वीटा राममंदिराच्या पायाभरणीसाठी वापरण्यात येणार आहे. सुवर्ण अक्षरात लिहावा असा हा ऐतिहासिक सोहळा आज संपन्न झाला. Ayodhya Ram Mandir Bhumi Pujan: हनुमानगढ़ी मंदिर,राम लल्ला मंदिर मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पूजा संपन्न

या कार्यक्रमापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हनुमानगढ़ी मंदिर मध्ये हनुमानाची पूजा संपन्न झाली आहे. प्रथेनुसार, अयोद्धा नगरीचा द्वारपाल हा हनुमान आहे त्यामुळे रामाच्या पुजेआधी त्याच्याकडून परवानगी घेण्याची प्रथा आहे. त्यानुसार सर्वात प्रथम हनुमानाची पुजा झाली आहे.

कोरोना संकटामध्ये आज अयोद्धेमध्ये राम मंदिर भूमिपुजन आणि शिलान्यास कार्यक्रम पार पडत असल्याने सुरक्षेसोबत खबरदारीदेखील घेतली गेली. केवळ निवडक लोकांच्या उपस्थितीमध्ये आणि सोशल डिस्टन्सिंग पाळून हा कार्यक्रम पार पडला.