हनुमान गढी । Photo Credits: Twitter/ ANI

अयोद्धेमध्ये आज रामजन्मभूमीच्या जन्मस्थानी श्रीरामाचं मंदिर साकारण्यासाठी भूमीपुजन आणि शिलान्यासचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हनुमानगढ़ी मंदिर मध्ये हनुमानाची पूजा संपन्न झाली आहे. प्रथेनुसार, अयोद्धा नगरीचा द्वारपाल हा हनुमान आहे त्यामुळे रामाच्या पुजेआधी त्याच्याकडून परवानगी घेण्याची प्रथा आहे. त्यानुसार सर्वात प्रथम हनुमानाची पुजा झाली आहे. थोड्याच वेळात म्हणजे 12.30 ते 12.40 दरम्यान भूमिपुजन आणि शिलान्सास कार्यक्रम पार पडेल.

दरम्यान आजच्या राम मंदिर भूमिपुजन आणि शिलान्यास कार्यक्रमासाठी नरेंद्र मोदी सिल्कच्या पिवळ्या कुर्ता आणि धोतर अशा पारंपारिक वेशभूषेमध्ये आले आहे. हनुमानगढीवर आरती दरम्यान त्यांच्यासोबत केवळ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ होते. आता हनुमानगढीच्या पुजेनंतर ते रामलल्लांचं पूजन केले. त्यानंतर मुख्य कार्यक्रम पार पडेल.

हनुमानगढीच्या पुजेची दृश्य

राम लल्लांचं दर्शन 

 

कोरोना संकटामध्ये आज अयोद्धेमध्ये राम मंदिर भूमिपुजन आणि शिलान्यास कार्यक्रम पार पडत असल्याने सुरक्षेसोबत खबरदारीदेखील घेतली जात आहे. केवळ निवडक लोकांच्या उपस्थितीमध्ये आणि सोशल डिस्टन्सिंग पाळून हा कार्यक्रम पार पडला आहे.