दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (South East Central Railway) SECR शिकाऊ पदांसाठी (Apprentice Posts) अर्ज मागवत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी SECR ने secr.indianrailways.gov.in वर अर्ज भरण्याचे अवाहन केले आहे. त्यासाठीची जाहीरातही प्रसिद्ध झाली असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 जुलै 2023 आहे. जाहिरातीत दिलेल्या माहितीनुसार, या भरतीद्वारे 772 पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी पदसंख्या, पात्रता आणि इतर निकष खालीलप्रमाणे असतील. सरकारी नोकरीची आणि त्यातही रेल्वेमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न बाळगून असलेल्या अनेक तरुणांना या भरतीद्वारे संधी मिळू शकते.
जागांबद्दल तपशील
- नागपूर विभागासाठी: 708 पदे
- मोतीबाग येतील कार्यशाळेसाठी : 64पदे
- एकूण जागा- 772
पात्रता निकष (Eligibility Criteria)
- उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळाकडून 10वीची परीक्षा किंवा त्याच्या समकक्ष शिक्षण घेतलेला असावा. त्याने सदर परिक्षा किमान 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी
- उमेदवाराकडे अधिसूचित ट्रेडमध्ये राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र असणे आवश्यक
- 6 जून 2023 रोजी उमेदवाराची वयोमर्यादा 15 ते 24 वर्षांच्या दरम्यान असावी.
या भरतीची जाहीरात आपण येथे क्लिक करुन पाहू शकता.
Selection Process: निवड प्रक्रिया अधिसूचनेनुसार अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांच्या संदर्भात तयार केलेल्या गुणवत्ता यादीवर आधारित असेल. ज्या ट्रेडमध्ये अॅप्रेंटिसशिप करायची आहे त्या ट्रेडमधील मॅट्रिक आणि आयटीआयमधील गुणांच्या टक्केवारीच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल. उमेदवारांना 8 जून ते 7 जुलै या कालावधीत ऑनलाइन अर्ज सादर करता येईल. अर्जाची कोणतीही प्रत्यक्ष प्रत एसईसीआरच्या नागपूर विभागाकडे पाठवण्याची आवश्यकता नाही.