बीपीसीएल (Bharat Petroleum Corporation Limited) कडून आता ग्राहकांना समाधानकारक सुविधा देण्यासाठी “Pure for Sure” या सुविधेची सुरूवात करण्यात आली आहे. या सुविधे अंतर्गत आता एलपीजी सिलेंडर ग्राहकांना पोहचल्या जाणार्या गॅस सिलेंडर बाबत शाश्वती देखील दिली जाणार आहे. यामध्ये बीपीसीएल कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, कंपनी पुरवत असलेल्या गॅस सिलेंडरच्या दर्जाची आणि प्रमाणाची खात्री दएणार आहे. ग्राहकांना दिला जाणार सिलेंडर छेडछाड मुक्त असेल. ज्यावर QR कोड देखील दिसेल. याद्वारे उत्पादन केंद्राकडून ग्राहकाला सिलिंडरची हमी दिली जाईल.
स्कॅन साठी QR Code असेल
क्यू आर कोड स्कॅन नंतर ग्राहकांना सिग्नेचर ट्यूनसह खास प्युअर फॉर शुअर पॉप-अप येणार आहे. सिलेंडरबाबत सारे तपशील दिसतील. यामध्ये सिलेंडरचे वजन, त्यावर सील मार्क आहे की नाही? याची माहिती दिसेल. त्यामुळे ग्राहकांना सिलेंडरचा दर्जा त्याची डिलेव्हरी घेताना दिसणार आहे. यामुळे पारदर्शकता आणि विश्वास वाढणार आहे. जर सिलेंडर सोबत काही छेडछाड झाली असेल तर आपोआपच क्यू आर कोड स्कॅन होणार नाही.
एलपीजी इकोसिस्टममध्ये काही जुन्या समस्या आहेत जसे की ट्रांझिटमध्ये चोरी, अपेक्षित वितरण वेळेत ग्राहकांची उपस्थिती आणि रिफिल डिलिव्हरीसाठी स्वतःची वेळ निवडणे, ज्याचे निराकरण केले जाऊ शकते. आमच्या वितरकांसाठी, ते AI बेस्ड रूट ऑप्टिमायझर सारख्या सेवा देईल. ज्यामुळे त्याची वितरण कार्यक्षमता वाढेल. एलपीजी इकोसिस्टममध्ये डिलिव्हरी वुमनचाही समावेश करण्याचा आमचा मानस आहे, कारण हे उत्पादन महिलांपेक्षा चांगले कोणीही समजत नाही.