केंद्र सरकारने काल सरकारी कर्मचार्यांच्या डीए मध्ये वाढीची घोषणा केल्यानंतर आता केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केल्यानंतर आता देशातील सर्व नोकरदारांनादेखील दिवाळीची भेट मिळण्याचे संकेत आहेत. मागील काही दिवसांपासून भविष्य निर्वाह निधी खात्यातील पैशांवरील व्याज (PF Interest) नोकरदारांच्या खात्यात जमा होणार असल्याची चर्चा होती. मात्र, EPFO ने 2020-21 या आर्थिक वर्षाचे व्याज पीएफ खातेधारकांच्या खात्यात जमा होण्याला सुरुवात झाली आहे. देशातील सुमारे 6.5 कोटी ग्राहकांच्या खात्यात पैसे येण्यास सुरूवात झाली आहे. सध्या ही प्रक्रिया सुरू झाली असल्याने हळूहळू सार्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतील. व्याजाची रक्कम विभागनिहाय जमा केल्यामुळे अजून सर्वांच्या खात्यात पैसा जमा झालेले दिसणार नाहीत.
कामगार मंत्रालयाची मंजुरी मिळाल्यानंतर 8.5% या दराने ईपीएफओ ग्राहकांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. गेल्या वर्षी 2019-20 या आर्थिक वर्षात केवायसीच्या गोंधळामुळे अनेकांना थांबावं लागलं होतं. EPFO ने 2020-21 या आर्थिक वर्षात व्याजदरामध्ये कोणतेही बदल करण्यात आले नव्हते. हा मागील सात वर्षामधील सर्वात कमी व्याजदर आहे. नक्की वाचा: PF Nomination Update: पीएफ धारकांना पूर्ण फायदा मिळवण्यासाठी EPF/EPS Nomination Online करणं गरजेचं; पहा स्टेप बाय स्टेप ते कसं कराल?
ऑनलाईन पीएफ बॅलन्स कसा तपासणार?
तुम्ही पीएफ बॅलन्स एसएमएस आणि मिस्ड कॉल अशा दोन पर्यायांनी तपासू शकता. यामध्ये एसएमएस द्वारा माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला 7738299899 वर EPFOHO असा मेसेज करावा लागेल. तर मिस्ड कॉलच्या माध्यमातून बॅलन्स जाणून घेण्यासाठी तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून 011-22901406 वर एक मिस कॉल द्यावा लागेल. यानंतर PF चा तपशील ईपीएफओच्या मेसेजद्वारे उपलब्ध होईल.
epfindia.gov.in या वेबसाईट वर देखील तुम्ही बॅलन्स चेक करू शकता. भारतामध्ये 6.5 कोटी सब्सस्क्रायबर आहेत. टप्प्याटप्प्याने पीएफ चे पैसे विभागानुसार युजर्जच्या खात्यामध्ये जमा होत आहेत.