EPFO (Photo Credits-Facebook)

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) पीएफ जमा करणाऱ्या मेंबर्ससाठी गुंतवणूक अधिक पारदर्शक करण्यासाठी अनेक पावले उचलत आहे. गेल्या काही वर्षांत, ईपीएफओने आपली प्रणाली अशा प्रकारे अपडेटेड केली आहे की, ईपीएफओ ग्राहक आता यूएएन नंबरशिवाय त्यांचे पीएफ किंवा ईपीएफ शिल्लक तपासू शकतात. सर्वसाधारणपणे, ईपीएफ शिल्लक तपासण्यासाठी यूएनएन आवश्यक असते. परंतु, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेने आपल्या सदस्यांसाठी प्रक्रिया अधिक सुलभ करत, युएएनशिवाय शिल्लक तपासण्याचा पर्याय दिला आहे.

यासाठी सर्व प्रथम, आपल्याला ईपीएफओच्या होमपेजवर जावे लागेल. epfindia.gov.in ही ईपीएफओची वेबसाइट आहे.

  • ईपीएफ ग्राहकांना epfindia.gov.in वर लॉग इन करावे लागेल.
  • त्यानंतर 'click here to know your PF balance' वर क्लिक करावे लागेल.
  • यानंतर, ग्राहकांसाठीepfoservices.in.epfo असे नवीन पेज उघडेल.
  • त्याठिकाणी मागितलेली माहिती ग्राहकांना पेजवर भरावी लागेल, जसे की- आपले राज्य, ईपीएफ कार्यालय, स्थापन कोड (Establishment Code), पीएफ खाते क्रमांक आणि इतर तपशील
  • त्यानंतर, Acknowledgement बटन आणि 'I Agree' ऑप्शनवर क्लिक करा.
  • त्यानंतर आपला पीएफ किंवा ईपीएफ शिल्लक आपला कॉम्प्यूटर मॉनिटर किंवा सेलफोन डिस्प्लेवर दिसून येईल.

दरम्यान, कर्मचार्‍यांना त्यांच्या पीएफ खात्याची व्यवस्थित माहिती मिळावी यासाठी, ईपीएफओने अनेक सेवा सुरू केल्या आहेत. आपल्याकडे युएएन नंबर असेल तर आपण फोनवरून, एसएमएसद्वारे किंवा वेबसाईटला भेट देऊन आपल्या पीएफ खात्याची माहिती मिळवू शकता.

एसएमएस सेवेसाठी यूएएन पोर्टलमध्ये, सक्रिय सदस्यांना त्यांचा नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून, ‘EPFOHO UAN’ असा एसएमएस लिहून तो 7738299899 क्रमांकावर पाठवावा लागेल. विशेष म्हणजे ही सुविधा 10 भाषांमध्ये उपलब्ध आहे. (हेही वाचा: कोरोना महामारीमध्ये LIC कडून मोठा दिलासा; रुग्णालयात मृत्यू झाल्यास क्लेम सेटलमेंटसाठी आता 'हे' पुरावेही वापरू शकता

फोनवरून ही माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला फक्त 011-229-01-406 नंबरवर मिस कॉल द्यावा लागेल. परंतु लक्षात ठेवा आपण ज्या नंबर वरून कॉल करीत आहात तो फोन नंबर ईपीएफओसह नोंदणीकृत असावा.