OIL Recruitment 2021: ऑईल इंडिया लिमिटेड मध्ये ज्युनियर असिस्टंड या पदांसाठी नोकरीची संधी; 15 ऑगस्ट पर्यंत oil-india.com वर करा अर्ज
प्रतिकात्मक फोटो (File Photo)

ऑईल इंडिया लिमिटेड मध्ये ज्युनियर असिस्टंट या पदांसाठी नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवारांना ओआईएल ची अधिकृत वेबसाईट अर्थात www.oil-india.com वर ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे. जारी करण्यात आलेल्या नोटिफिकेशन मध्ये 120 जागांवर नोकरभरती केली जाईल अशी माहिती देण्यात आली आहे. दरम्यान उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन नीट वाचावे अशी माहिती देण्यात आली आहे.

ऑईल इंडिया मध्ये अर्ज करणार्‍या उमेदवारांचे शिक्षण हे किमान 12 वी पास असणं आवशय्क आहे. सोबतच त्यांच्याकडे 6 महिन्यांचा कम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन मध्ये डिप्लो मा केलेला असणं आवश्यक आहे. उमेदवारांची निवड त्यांच्या अर्जांसोबतच एका परीक्षेद्वारा देखील होणार आहे. 100 गुणांसाठी 2 तासांची सीबीटी परीक्षा होणार आहे. यामध्ये मिळालेल्या मार्कांनुसार मेरीट लिस्ट लावली जाईल. Maharashtra Anganwadi Recruitment 2021: बाल विकास प्रकल्प जालना कडून होणार अंगणवाडी सेविकांची नोकरभरती; 9 जुलै पूर्वी करा अर्ज.

ऑईल इंडिया मध्ये अर्ज करणार्‍या उमेदवारांचे वय हे 18-30 वर्ष असणं आवशय्क आहे. दरम्यान आरक्षित वर्गाला वयामध्ये मिळणारी सूट इथे देखील लागू असेल. ओबीसी ला 3 वर्ष आणि एससी, एसटी ला 5 वर्ष सूट असेल. या प्रवेश अर्जामध्ये उमेदवाराला 200 रूपये शुल्क देखील भरावा लागणार आहे. एससी, एसटी वर्गातील उमेदवारांना मात्र हे शुल्क माफ असेल. 1 जुलै पासून सुरू झालेली ही ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया आता 15 ऑगस्ट पर्यंत सुरू राहणार आहे.