खुशखबर! शिधापत्रिका होणार पोर्ट; कोणत्याही सरकारमान्य दुकानातून भरु शकता रेशन
Ration | (Photo courtesy: archived, edited, representative image)

सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शिधापत्रिका (Ration card) आता लवकरच पोर्ट होणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानातून रेशन भरणे सोपे होणार आहे. ही सुविधा लवकरात लवकर सुरु व्हावी यासाठी केंद्र सरकार हालचाली करत असून, सुरु असलेल्या वर्षाखेरीस स्वॉफ्टवेअर टेस्टींगही पूर्ण करण्याबाबत काम सुरु आहे. याशिवाय भारत सरकारकडे बफर सिस्टिम विकसित करण्यासाठीही अतिरिक्त खाद्यान्न उपलब्ध करण्याचा प्रस्ताव आहे.

प्राप्त माहितीनुसार, शिधापत्रिका पोर्टेब्लिटी प्रणालीनुसार एखाद्या शिधापत्रिका धारकाने एकाद्या दुकानातून फिंगर प्रिंटच्या माध्यमातून अन्नधान्य भरले असेल तर, ती माहिती स्वयंचलितपणे सर्व्हरमध्ये साठवली जाईल. त्यामळे संबंधित शिधापत्रिका धारकाने जर पुन्हा अन्नधान्य खरेदी करण्याचा प्रयत्न केल्यास सर्व्हरमधला डेटा त्याच्याविषयी माहिती देईल. त्यामुळे एकाच शिधापत्रिका धारकास एकाच महिन्यात दुसऱ्यांदा अन्नधन्य खरेदी करता येणार नाही. त्यामुळे या क्षेत्रात होणाऱ्या भ्रष्टाचारालाही चांगलाच चाप बसणार आहे. नवभारत टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे. (हेही वाचा, आता अवघ्या 4 तासात मिळेल PAN Card)

रेशनिंग दुकानात शिधापत्रिका धारकांना अन्नधान्य पुरवताना अनेकदा भ्रष्टाचार होत असल्याच्या बातम्या येत असतात. तसेच, दुकानदार आणि साठेबाज यांच्या संगनमतामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या हक्काच्या अन्नधान्यामुळे वंचित राहावे लागते. मात्र, रेशन कार्ड पोर्टेब्लिटी प्रणाली लागू झाल्यास शिधापत्रिका धारकांना त्याचा फायदाच होईल असे सांगितले जात आहे.