LIC Home Loan: LIC हाऊसिंग फायनान्सने आपल्या कर्जदरात 0.35 टक्क्यांनी वाढ केली आहे. ज्या ग्राहकांनी एलआयसीकडून गृहकर्ज (LIC Housing Finance) घेतले आहे किंवा घेण्याची योजना आखली आहे. त्यांना याचा मोठ्या धक्का बसला आहे. एचडीएफसीने दर वाढवल्यानंतर एका आठवड्यानंतर एलआयसीचे हे पाऊल उचलले आहे. HDFC ने व्याजदर 0.35 टक्क्यांनी वाढवले आहेत.
नवीन बदलानुसार, LIC हाऊसिंग फायनान्स व्याजाचा किमान दर 8.65 टक्के केला जाईल. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, त्यांनी LIC हाउसिंग प्राइम लेंडिंग रेट (LHPLR) मध्ये 0.35 टक्क्यांनी वाढ केली आहे, जो त्याच्या कर्जावरील व्याजदर आहे. (हेही वाचा - Home And Car Loan EMI: वाहन आणि गृहकर्ज व्याजदर वाढल्यावर कसे जुळवाल हप्त्याचे गणित)
कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी वाय विश्वनाथ गौड म्हणाले की, ही दर वाढ बाजारातील परिस्थितीनुसार आहे. सध्या रिअल इस्टेट क्षेत्रातील घरे खरेदीचे आकडे सातत्याने मजबूत होत आहेत. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांची कर्जे महाग होत आहेत. याचा होम लोन ईएमआयवर मोठा परिणाम झाला आहे. आरबीआयने गृहकर्जाचे दर वाढवल्यानंतर बँका आणि वित्तीय कंपन्या त्यांच्या कर्जाचे दर एकापाठोपाठ एक वाढवत आहेत. त्यामुळे ईएमआयचा भार वाढत आहे.
एलआयसी हाऊसिंग फायनान्स ही भारतीय आयुर्विमा महामंडळाची उपकंपनी आहे. एलआयसी हाऊसिंग फायनान्स ही कंपनी लोकांना घर, जमीन, दुकान इत्यादी मालमत्ता खरेदी करण्यासाठी कर्ज पुरवते.