डान्स करताना उडवली खिल्ली, प्रशिक्षकाची हत्या
प्रातिनिधीक प्रतिमा (Gun-Shooting)

दिल्लीमध्ये धार्मिक कार्यक्रमाच्यावेळी नाचणाऱ्या तरुणाने खिल्ली उडवल्याने त्याने प्रशिक्षकाची हत्या केल्याची घटना घडली आहे. तर आरोपीने गोळ्यांनी प्रशिक्षकावर हल्ला केल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.

वाल्मिकी जयंतीनिमित्त दिल्लीमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी तेथे एक तरुण नाचत असताना प्रशिक्षकाने त्याच्याकडे पाहून त्याची खिल्ली उडविण्यास सुरुवात केली. यामुळे त्या तरुणाने खिशातील बंदुक काढून त्या प्रशिक्षकावर हल्ला केला. या घटनेमुळे प्रशिक्षक गंभीर झाला मात्र उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

या घटनेतील आरोपीला पकडण्यात आले असून अन्य आरोपींचा शोध सुरु आहे. तसेच या कार्यक्रमाच्यावेळी उपस्थित असलेल्या लोकांची कसून चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.