Lok Sabha Elections 2019 Seventh Phase Voting: लोकसभा निवडणूकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात देशात 0.21% मतदान, पश्चिम बंगाल मध्ये सर्वाधिक तर बिहारमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद
(Photo Credits: Twitter/ANI)

लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Elections)  शेवटचा टप्प्यात आज देशभरातील आठ,राज्यांमधील 59 जागांसाठी मतदान पार पडले . यंदा संपूर्ण देशात सात टप्प्यांमध्ये मतदान घेण्यात आले असून आज उघड होणाऱ्या एक्सझिट पोल (ExitPoll) मध्ये जनतेचा कौल कोणत्या पक्षाच्या पारड्यात पडेल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

ANI वृत्त वेबसाईटने मार्फत दिलेल्या महितीनुसार सातव्या टप्प्यात केवळ 0.21 टक्के मतदान झाले असून आजवरच्या टप्प्यांमधील सर्वात कमी टक्केवारी पाहायला मिळतेय, यामध्ये बिहार (Bihar) , हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh), मध्य प्रदेश (Madhya Pradesh) , उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) , पंजाब (punjab) , पश्चिम बंगाल (West Bengal) , चंदिगढ (chandigarh) , झारखंड  (Jharkhand) या राज्यात मतदान पार पडले.

सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत घेण्यात आलेल्या मतदानात पश्चिम बंगाल मध्ये सर्वाधिक म्हणजेच 73.05 टक्के मतदान झाले आहे तर बिहार मध्ये सर्वात कमी म्हणजे 49.92 टक्के मतदान झाले आहे.

आठ राज्यांमध्ये  झालेल्या मतदानाची सरासरी टक्केवारी

बिहार- 49.92%

हिमाचल प्रदेश- 66.18%

मध्य प्रदेश - 69.38%

उत्तर प्रदेश -54.37%

पंजाब- 58.81%

पश्चिम बंगाल- 73.05%

झारखंड- 70.5%

चंदिगढ- 63.57%

ANI ट्विट

याबरोबरच 17 व्या लोकसभा निवडणुकीचे सात ही टप्पे पार पडले असून. येत्या 23 मे ला मतमोजणी नंतर निकाल जाहीर करण्यात येईल.