Lok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणुकीच्या काळात एका महिन्यात साडेचार कोटी ट्वीट्स, सर्वेक्षणातून माहिती उघड
Twitter (Photo Credits-PTI)

Lok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणुकीचा तारखा निवडणुक आयोगाने जाहीर केल्यानंतर सर्वत्र निवडणुकीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच सध्या सोशल मीडियाचा वापर अधिकाधिक होत असल्याने राजकीय पक्षसुद्धा निवडणुकीसाठी आपल्या पक्षासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करतात. तर आता ट्वीटरने केलेल्या सर्वेक्षणानुसार गेल्या एका महिन्यात तब्बल 4 कोटी 56 लाख ट्वीट्स केले असल्याची माहिती समोर आले आहे.

ट्वीटरमध्ये ट्वीट्स करण्यात आलेल्यामध्ये युजर्सनी जास्तकरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा उल्लेख आहे. तर पहिल्या टप्प्याचे मतदान 11 एप्रिल रोजी पार पडले. प्रचारसभा, घोषणापत्र, धोरण आणि विविध सामाजिक विषयांवर ट्वीटवर सर्वात जास्त ट्वीट करत चर्चा केल्याचे समोर आले आहे.तर 11 एप्रिल रोजी 12 लाख ट्वीट्स करण्यात आले असल्याची माहिती ट्वीटरने दिली आहे.(हेही वाचा-Lok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणूक पहिला टप्पा - कोणत्या राज्यात किती टक्के मतदान? घ्या जाणून)

निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर ट्वीटरने सर्वेक्षण केले असून ही माहिती समोर आली आहे. तसेच सर्वेक्षणानुसार ट्वीटरचा उपयोग कशासाठी केला जात आहे याचा प्रयत्न केला गेला आहे. त्यामध्ये 80 टक्के युजर्सनी जगात कोणत्या घडामोडी होत आहेत याबद्दल सर्च करत असल्याचे म्हटले आहे.