
कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) संकट काळात लॉकडाऊनमुळे अनेकांचे विवाह लांबणीवर गेले आहेत. मात्र, अशा कठीण स्थितीत अनेक विवाह सोहळ्याचं आयोजन केलं जात आहे. अशाच एका घटनेत लग्न करणं एका व्यक्तीला चांगलंच मागगत पडलं आणि त्याला तब्बल 6,26,600 रुपयांचा फटका बसला आहे. राजस्थानमधील (Rajasthan) भिलवाडा (Bhilwara) येथे ही घटना घडली. भिलवाडा येथील भड्डा मौहल्ली येथे राहणारे घीसूलाल राठी यांना मुलगा रिझुलच्या लग्नात परवानगी पेक्षा जास्त पाहुण्यांना बोलावणे महागात पडले. या लग्नात 16 लोकांना संसर्ग झाला असून कोरोनामुळे नवऱ्याच्या आजोबांचा देखील मृत्यू झाला आहे. लग्नात पन्नास पाहुण्यांच्या संमेलनासाठी कुटुंबाने परवानगी घेतली होती मात्र त्यांना 250 लोकांना आमंत्रित केले. कोणतेही मास्क आणि सॅनिटायझर्स वापरण्यात आले नाहीत शिवाय सोशल डिस्टंसिंगचेही पालन केले गेले नाही. भिलवाडा वैद्यकीय विभागाने 58 जणांना फॅसिलिटी आणि 15 सकारात्मक संक्रमितांना रुग्णालयात दाखल केले. (Coronavirus Update: भारतात COVID-19 रुग्णांच्या आतापर्यंतची सर्वाधिक वाढ; 19,906 नव्या रुग्णांसह देशात एकूण कोरोना बाधितांची संख्या 5,28,859 वर)
दुसरीकडे, या व्हायरसच्या धोक्याची जाणीव असूनही 22 जून रोजी निकषांचे उल्लंघन आणि इतरांच्या जीवाला धोका निर्माण केल्याबद्दल कुटुंबाविरूद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता. विशेष म्हणजे, पहिल्यांदाच भिलवाडा जिल्हाधिकारी यांनी शनिवारी कुटूंबियांना पुढील तीन दिवसांत मुख्यमंत्री मदत निधीत 6,26,600 रुपये जमा करण्याचे आदेश दिले. या रूग्णांच्या चाचणी, उपचार, अलग ठेवणे, पृथक्करण वार्ड, भोजन निवास आणि रुग्णवाहिका तसेच वाहतुकीसाठी येणारा खर्चासाठी ही रक्कम वापरली जाईल.
दरम्यान, लग्न कार्यक्रम 13 जून रोजी आयोजित करण्यात आले होते असे म्हटले जात आहे. नियमांपेक्षा अधिक पाहुण्यांना आमंत्रित केल्याने कोरोनाचे फैलाव झाला. कुटूंबासह अन्य 16 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. या नंतर एकूण 58 लोकांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. कोरोनाच्या निष्काळजीपणासाठी इतका भारी दंड लादण्यात आल्याची ही कदाचित देशातील पहिलीच घटना आहे.