Pan Aadhaar Linking: जर तुम्ही आपला पॅन नंबर तुमच्या आधार कार्डशी (Aadhaar Card) लिंक केलेला नसेल तर पुढच्या महिन्यापासून तुमचे पॅन कार्ड (PAN Card) निष्क्रिय होईल. म्हणजेच, पुढच्या महिन्यापासून तुम्हाला कोठेही पॅनकार्ड वापरता येणार नाही. हे टाळण्यासाठी आपण आपला पॅन नंबर लवकरात लवकर आधार कार्डशी जोडणं आवश्यक आहे. पॅनकार्ड आधार कार्डशी लिंक करण्यासाठी सरकारने अनेक वेळा मुदतवाढ दिली आहे. मागच्या वेळी ही अंतिम मुदत 30 जून 2020 होती. मात्र, यात वाढ करून ती 31 मार्च 2021 करण्यात आली होती. आपण 31 मार्च 2021 पर्यंत आपले पॅन कार्ड आधारशी लिंक केले नाही, तर आपला पॅन नंबर निष्क्रिय होईल. पॅन नंबर निष्क्रिय झाल्यानंतर आपल्याला अनेक व्यवहार करण्यास अडथळा येऊ शकतो.
निष्क्रिय पॅन कार्डमुळे भरावा लागू शकतो दंड -
जर आपण मुदतीच्या आत पॅन नंबर आधार कार्डशी लिंक करू शकला नाही किंवा आपला पॅन नंबर निष्क्रिय झाला असेल तर आपला पॅन कायद्याने आवश्यक असलेल्या नियमांची पूर्तता करीत नाही, असं समजण्यात येईल. तसेच तुमच्याकडून आयकर कायदाच्या कलम 272 बी अंतर्गत 10,000 रुपये दंड आकारला जाऊ शकतो. (वाचा - तुम्हाला LPG Cylinder वर Subsidy मिळते की नाही? काही मिनिटांत करू शकता चेक; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया)
पॅन कार्ड का महत्वाचे आहे?
पॅन कार्ड बर्याच आर्थिक कामांसाठी महत्वाचे असते. बँक खाते उघडण्यासाठी आणि म्युच्युअल फंड किंवा स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणे करण्यासाठी पॅनकार्ड आवश्यक असते. 50,000 रुपयांच्या वरच्या व्यवहारांसाठीही पॅनकार्ड आवश्यक आहे.
- 'असे' करा पॅन-आधार कार्ड लिंक -
पॅनला आधारशी जोडण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला आयकर विभागाच्या ई-फाइलिंग पोर्टलवर जावे लागेल.
- आता तुम्हाला डाव्या बाजूला असलेल्या Link Aadhaar सेक्शनमध्ये क्लिक करावे लागेल.
- येथे आपल्याला पॅन क्रमांक, आधार क्रमांक आणि नाव प्रविष्ट करावे लागेल.
- आता आपल्याला कॅप्चा कोड प्रविष्ट करावा लागेल.
- आता तुम्हाला 'Link Aadhaar' पर्यायावर क्लिक करावे लागेल.
आता प्राप्तिकर विभाग आपले नाव, जन्मतारीख इ. सत्यापित करेल आणि त्यानंतर जोडण्याची प्रक्रिया पूर्ण होईल. अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या आपल्या पॅन-आधारची जोडणी करू शकता. यासाठी तुम्हाला वरील स्टेप्स नक्की उपयोगात येतील.