तुम्हाला कोणतेही आर्थिक व्यवहार करायचे असेल तर तुम्हाला आधारकार्ड (Aadhaar Card) आणि पॅनकार्डची (Pan Card) गरज भासते. त्याचबरोबर ही भारतीय असल्याची ही दोन महत्त्वाची ओळखपत्रे ही एकमेकांना लिंक असणे गरजेचे आहे. त्याशिवाय कोणतेही महत्त्वाचे आणि मोठे आर्थिक व्यवहार करता येणार नाही. अजूनही तुम्ही तुमचे आधार कार्ड पॅन कार्डशी (Aadhaar PAN Link) लिंक केले नसेल तर ताबडतोब करा. कारण सरकार या अशा लोकांवर कडक कारवाई करणार आहे. त्यासाठी आयकर विभागाने अंतिम तारीख दिली आहे. त्या तारखेआधी तुम्ही तुमचे आधार कार्ड पॅनकार्डशी लिंक करा.
रिपोर्टनुसार, येत्या 31 मार्च 2021 पर्यंत तुम्ही तुमचे आधारकार्ड पॅनकार्डशी लिंक करणे अनिवार्य आहे. या तारखेपर्यंत जर कुणी हे काम केले नाही तर त्यांना 10,000 रुपये दंड भरावा लागणार आहे. आयकर विभागाने याबाबत माहिती दिली असून आधारकार्ड पॅन कार्डशी लिंक न करणा-यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो असेही सांगण्यात येत आहे.हेदेखील वाचा- Aadhaar-PAN Card लिंक करण्यासाठी 31 मार्च 2021 पर्यंत मूदतवाढ; जाणून घ्या आधार-पॅन लिंक करण्याची ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धत
हे काम न करणा-यांना पॅनकार्डधारकांचे न केवळ गैर पॅनकार्डधारक माानले जाईल तर त्यांना आयकर अधिनियमांतर्गत कलम 272बी 10,000 रुपयांचा दंड भरावा लागेल.
बँक अकाउंट खाते उघडण्यासाठी, म्युचअल फंड वा शेअर खरेदी करण्यासाठी वा 50,000 रुपयांपेक्षा जास्त कॅश ट्रान्जेक्शन करण्यासाठी पॅनकार्ड अनिवार्य आहे. तथापि, असे सर्व इनऑपरेटिव पॅनकार्ड ऑपरेटिव होतील. त्यासाठी आधारकार्ड पॅनकार्डशी लिंक होणे गरजेचे आहे.
आधार आणि पॅन कार्ड SMS द्वारे लिंक करण्यासाठी 56161 किंवा 567678 या क्रमांकावर टेक्स्ट मेसेज करा. यासाठी UIDPAN<12 Digit Aadhaar> <10 Digit PAN> असा मेसेज करा. उदा. तुमचा आधार कार्ड नंबर 586738291086 असेल आणि पॅन कार्ड नंबर KBJH11234M असेल. तर मेसेज UIDPAN 586738291086 KBJH11234M असा टाईप करा आणि मेसेज 56161 किंवा 567678 या क्रमांकावर पाठवा.