नव्या वर्षात कामाजात, कार्यप्रणालीत मोठे बदल करण्यात आले आहेत. बॅंक, सरकारी कामकाज, कर्ज प्रक्रीया, विमा नियम यांत मोठे बदल करण्यात आले आहेत. तरी २०२३ या नव्या वर्षापासून हे नवे नियम लागू होणार आहे. पुर्वी कुठल्याही विमाधारकास विमा काढण्यासठी कागदपत्रांची एक सुची दिल्या जायची त्यानुसार कागदपत्र जमा केलीत की लगेच विमा काढता यायचा. पण आता या कागदपत्रांमध्ये आणखी एका कागदाची भर पडली आहे आणि त्याशिवाय विमा काढणं अशक्य होणार आहे. आता कुठल्ही प्रकारचा विमा काढण्यासाठी विमा धारकांना केवायसी करणं आता अनिवार्य असणार आहे. कोणत्याही प्रकारचा विमा घेण्यासाठी केवायसी कागदपत्रं देणं बंधनकारक असणार आहे. आता पर्यत केवायसी संबंधीत कागदपत्र देणं अनिवार्य नाही तर एच्छीक होत पण आता यापुढे केवायसी कागदपत्र देणं आवश्यक असणार आहे.
केवायसीमुळे नव्या नियमांमुळे इन्शोरन्स क्लेम प्रॉसेस (Insurance Claim Proccess) साठी लागणारा वेळ कमी करणं शक्य होणार आहे. ज्यामुळे फसवणूक करणाऱ्या आणि खोट्या इन्शोरन्स क्लेम प्रॉसेसला आळा बसण्यास मदत होईल. तरी आरोग्य, वाहन, घर इत्यादी सर्व नवीन विमा पॉलिसी खरेदी करण्यासाठी KYC नियम अनिवार्य (KYC Norms Mandatory) करण्यात आले आहेत. सर्व विमा पॉलीसी काढताना तुम्हाला केवायसी कागदपत्रं देणं आवश्यक असणार आहे. (हे ही वाचा:- New Rules in 2023: क्रेडीट कार्ड, बँक लॉकर, आधार-पॅन लिंक यांसह अनेक नियमांमध्ये 1 जानेवारी 2023 पासून महत्त्वाचे बदल, घ्या जाणून)
नव्या वर्षासोबतच अनेक नवीन नियमही लागू झाले आहेत. पॉलिसी घेण्यापूर्वी केवायसी संबंधीत कागदपत्रं सक्तीनं द्यावी लागतील. तरी तुम्ही देखील कुठल्ही प्रकारचा विमा काढायचा विचार करत असाल तर हो ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुमचा, घराचा, वाहनाचा असा कुठल्याही प्रकारचा विमान काढण्याचा तुम्ही विचार करत असल्यास आजच केवायसी करा म्हणजे विमा प्रक्रीया सहज पुर्ण करता येईल.