Jawaharlal Nehru 55th Death Anniversary: पंडित नेहरू यांच्या पुण्यतिथी दिनी सोनिया गांधी, राहुल गांधी सह कॉंग्रेस नेत्यांनी अर्पण केली श्रद्धांजली
Former PM Pandit Jawaharlal Nehru (Photo Credits: Wikimedia Commons)

Jawaharlal Nehru  Death Anniversary 2019: स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू (Jawaharlal Nehru) यांची आज 55 वी पुण्यतिथी आहे. 27 मे 1964 साली त्यांचे दिल्लीमध्ये निधन झाले. आज त्यांच्या स्मरणार्थ दिल्लीतील त्यांच्या 'शांतीवन' या स्मृतिस्थळावर कॉंग्रेस नेत्यांसह गांधी कुटूंबातील राहुल गांधी (Rahul Gandhi), सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. तर देशातील अनेक मान्यवरांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना आदरांजली अर्पण केली आहे.

ANI Tweet

राहुल गांधी

राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करताना, भारत देशामध्ये लोकशाही जपण्यासाठी काम करणार्‍या पंडीत नेहरू यांना आदरांजली अशा आशयाचं ट्विट केले आहे.

नरेंद्र मोदी

देशाचे सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवाहरलाल नेहरू यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.