ITR | Representational Image | (Photo Credits: PTI)

दरवर्षी आयकर विभागाकडून इन्कम टॅक्स रिटर्न (Income Tax Return) भरण्यासाठी भारतीय करदात्यांना आवाहन केलं जातं. 31 जुलै ही इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख असते. आर्थिक उत्त्पन्न 5 लाखापेक्षा अधिक आहे त्यांना टॅक्स भरणं बंधनकारक आहे. जर तुमची तारीख चुकली तर आयकर विभागाकडून तुम्हांला दंड आकारला जाईल.

कसा आकारला जाईल दंड

31 जुलैची तारीख चूकली तर 31 डिसेंबर पर्यंत IT फाईल करण्यास 5 हजार रूपये दंड तर 1 जानेवारी 2020 ते 30 मार्च 2020 पर्यंत आय टी रिटर्न भरल्यास करदात्यांकडून 10 हजार रूपये दंड आकारला जाणार आहे. ऑनलाईन माध्यमातून आय टी फॉर्म भरला जाणार आहे. नरेंद्र मोदी सरकारने 3 लाखपर्यंत टॅक्स सूट दिली आहे.

नुकत्याच निर्मला सीतारमण यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पामध्ये पॅन कार्ड प्रमाणेच आता आधार कार्डाचा वापर करूनही टॅक्स भरला जाऊ शकतो असं सांगण्यात आलं आहे. ऑनलाईन माध्यमाप्रमाणेच आता काही सेवा केंद्र उभारली आहेत. त्यामध्ये सशुल्क सेवा दिली जाणार आहे.