IRCTC Ticket Transfer Rules: आता तुम्ही सहज हस्तांतरीत करु शकता रेल्वे तिकीट; कसे? घ्या जाणून
IRCTC Ticket Transfer | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

रेल्वे प्रवास (Railway Travel) करण्यासाठी तुम्ही काढलेले रेल्वे तिकीट ( Railway Ticket) निश्चित आहे परंतू, आयत्या वेळी काही कारणाने तुम्हाला प्रवास रद्द करावा लागला आहे. अशा वेळी निश्चित झालेल्या तिकीटाचे करायचे काय? एक तर ते रद्द करावे लागते. रद्द करुन रेल्वेने आकारलेली रक्कम देऊन उर्वरीत पैसे परत करायचे किंवा सर्वच पैशांवर पाणी सोडून शात राहायचे, एवढाच पर्याय होता. पण आता तुम्ही तुमचे कन्फर्म केलेले तिकीट दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित (IRCTC Ticket Transfer Rules) करू शकता. तेसुद्धा कोणतेही नुकसान न करता.भारतीय रेल्वेने या संदर्भात प्रवाशाला कन्फर्म तिकीट दुसर्‍या व्यक्तीकडे हस्तांतरित करण्याची परवानगी देण्यासाठी सूचनांची एक नवी नियमावली जारी केली आहे.

रेल्वे प्रवासादरम्यान कन्फर्म तिकीट मिळवणे नेहमीच सोपे नसते. अनेकदा तर तिकीट खरेदी केल्यानंतर प्रवास रद्द होतो. अशा वेळी त्या तिकीटाचे करायचे काय असा प्रश्न रेल्वे प्रवाशांसमोर वारंवार उत्पन्न होतो. अशावेळी, त्यांना एकतर तिकीट रद्द करावे लागेल किंवा नंतर नवीन खरेदी करावे लागेल. या सर्वच गुंत्यातून सोडवणूक करण्याच्या उद्देशाने रेल्वने नवी सूचना जारी केली आहे. (हेही वाचा, Aadhaar-IRCTC Linking : महिन्याला 12 रेल्वे तिकीटं बूक करण्यासाठी IRCTC सोबत लिंक करा Aadhaar; पहा irctc.co.in वर ऑनलाईन कसे कराल लिंक?)

रेल्वेच्या नवीन नियमांनुसार, प्रवासी पती, पत्नी, वडील, आई, भाऊ किंवा बहिणीसह कुटुंबातील कोणत्याही जवळच्या सदस्याच्या नावावर कन्फर्म केलेले तिकीट ट्रान्सफर करू शकतात. ट्रेन सुटण्याच्या किमान 24 तास आधी प्रवाशाने यासाठी विनंती सबमिट करणे आवश्यक आहे. त्यानंतर प्रवाशाचे नाव तिकीटातून काढले जाईल आणि ज्या सदस्याच्या नावावर तिकीट हस्तांतरित केले गेले आहे त्या सदस्याच्या नावाने बदलले जाईल.

तिकीट हस्तांतरणाचे नियम, घ्या जाणून

  • जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल, तर तुम्ही ट्रेन सुटण्याच्या 24 तास आधी तुमची विनंती सबमिट करणे आवश्यक आहे.
  • तिकीट हस्तांतरण सेवेचे फायदे आहेत जे NCC अर्जदार देखील वापरू शकतात.

    सुट्टी, लग्न किंवा वैयक्तिक समस्या असल्यास प्रवाशाने प्रस्थानाच्या 48 तास आधी त्याबाबत कळवावे.

तिकीट हस्तातरणाची प्रक्रिया

  • तिकीट हस्तांतरण प्रक्रिया सुरू करण्यासाठी तुमच्याकडे तिकिटाची प्रिंटआउट असणे आवश्यक आहे.
  • ज्या व्यक्तीला तुम्हाला तिकीट हस्तांतरित करायचे आहे त्याचे मतदार ओळखपत्र किंवा आधार कार्ड सोबत ठेवा.
  • तुमच्या सर्वात जवळ असलेल्या रेल्वे स्टेशनवरील आरक्षण डेस्कला भेट द्या.
  • तिकीट हस्तांतरणाची विनंती करा.
  • तिकीट हस्तांतरण विनंती प्रस्थानाच्या किमान 24 तास आधी केली जाणे आवश्यक आहे.

तथापि, भारतीय रेल्वेने सांगितले की ट्रेनचे तिकीट फक्त एकदाच हस्तांतरित केले जाऊ शकते. याचा अर्थ असा की एकदा प्रवाशाने असे केले की, ते तिकीट नंतर दुसर्‍या व्यक्तीकडे हस्तांतरित केले जाऊ शकत नाही. म्हणून, जर तुम्ही आधीच एखाद्याला तिकीट हस्तांतरित केले असेल तर तुम्ही सेवा पुन्हा वापरू शकत नाही.