International Yoga Day 2019: शशांकासन कसे करावे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योगाभ्यासतील हे आसन ठरेल आरोग्यासाठी फायदेशीर (Watch Video)
Shashankasana (Photo Credits-Twitter)

International Yoga Day 2019: येत्या 21 जून रोजी जागतिक योगा दिन साजरा केला जाणार आहे. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे अॅनिमेटेड स्वरुपातील योगाभ्यासातील विविध प्रकाराचा व्हिडिओ रोज सोशल मीडियात पाहायला मिळत आहे. तर आज (15 जून) प्रसारित करण्यात आलेल्या व्हिडिओतून शशांकासन (Shashankasana) कसे करावे हे दाखवले आहे. योगाभ्यासातील हे  आसन आरोग्याला फायदेशीर ठरु शकतो.

शशांकासन याला संस्कृत भाषेत शशांक म्हणजे ससा. या आसनामध्ये आपल्या शरीराची स्थिती ससासारखी होते. हे आसन करताना सर्वात प्रथम वज्रासन स्थितीत बसावे. त्यानंतर दोन्ही हात दोन्ही पायांच्यावरती ठेवून पाय जेवढे लांब ताणता येतील तसे करावे. तसेच पाय दुमडले असल्याने दोन्ही पायांचे अंगठे एकमेकांना चिकटणे महत्वाचे आहे. त्यानंतर पायावरील हात काढून ते बसलेल्या स्थितीच्या मधोमध ठेवावे आणि हळूहळू श्वास सोडावा. असे केल्यानंतर दोन्ही हात काही सेकंदानी पुढे सरकवावे. मात्र दोन्ही हात हे समांतर बाजूने पुढे सरकायला हवेत. तुमचे लक्ष समोरच असावे. काही मिनीटे अशाच स्थित रहावे.

(International Yoga Day 2019: तुम्ही हे आसन केले आहे का? असा प्रश्न विचारत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले वज्रासनाचे धडे)

तर योगाभ्यासातील हे एक महत्वाचे आसन असून ते केल्याने कब्जच्या समस्या दूर होतात. त्याचसोबत पाठीचे आजार, उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींनी शशांकासन करताना सावधगिरी बाळगावी. पायात गाठी झाल्या असल्यास हे आसन करणे टाळावे. नियमीत स्वरुपात शशांकासन केल्याने मनावरील तणाव आणि राग कमी होण्यास मदत होते.