Instant PAN Card: झटक्यात मिळवा पॅन कार्ड, ना शुल्क ना, कागदपत्रांची झंजट, पाहा काय करावे लागेल?
PAN Card: | (Photo Credits: File Image)

कोणत्याही आर्थिक व्यवहारामध्ये पॅन कार्ड (PAN Card) हा सध्या एक परवलीचा शब्द झाला आहे. त्यामुळे बँक असो वा इतर कोणतेही व्यवहार पॅन कार्ड हवेच. कोणतेही पॅन कार्ड हे 10 अंकी अक्षरांसोबत येते. हा क्रमांकच महत्त्वाचा असतो. पण अनेकदा अगदी महत्त्वाच्या कामावेळी पॅन कार्ड विसरलेले असते किंवा गहाळ झालेले असते. अशा वेळी काय कराल? अगदी कोणतीही कागदपत्रे न देता. तसेच, कोणत्याही प्रकारचे शुल्क न देता तुम्ही तुमचे पॅन कार्ड तत्काळ (Instant PAN Card) परत मिळवू शकता. तेही अगदी मोफत. होय, कसे ते घ्या जाणून.

तत्काळ पॅन कार्ड मिळविण्यासाठी e-KYC (Aadhaar based e-KYC) वापरावे लागते. त्यासाठी आयकर विभागाच्या www.incometax.gov.in वर जा. तिथे Instant Pan पर्याय निवडा. इथे तुम्हाला ई-पॅन सेवा मिळेल. हे ई-पॅन पीडीएफ रुपात येते. आता तुम्हाला 'Get new E-PAN' पर्यायावर क्लिक करायचे आहे. तुम्हाला आधार नंबर मागितला जाईल. तो तिथे भरा आणि चेकबॉक्स तपासा. पुन्हा आयकर विभाग आपल्याकडून काही गोष्टींची पडताळणी करुन घेईल. तिथे असलेली माहिती वाचा आणि त्यानुसार विचारलेल्या प्रश्नांची योग्य (अचूक) उत्तरे द्या. हे प्रश्न साधारण खालील प्रमाणे असतील. (हेही वाचा, Aadhaar Card वरुन ड्युप्लिकेट PAN Card कसे मिळवाल? जाणून घ्या सोप्या स्टेप्स)

  • आपण या आधी कधी पॅन डाऊनलोड केले आहे काय?
  • आपला कार्यरत असलेला मोबाईल क्रमांक आधार क्रमांकाशी जोडला आहे काय?
  • आपल्या जन्मतारखेचा तपशील द्या. आपण अल्पवयीन आहात का?

वरील सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर आपल्या रिजस्टर्ड मोबाईल क्रमांकावर एक OTP (One Time Password) पाठवला जाईल. हा ओटीपी योग्य ठिकाणी भरल्यानंतर आपल्याला 15 अंकी एक्नॉलेजमेंट नंबर जनरेट होईल. तसेच, आपल्या पॅनची एक कॉपी आधारशी संबंधित ई-मेल आयडीवर पाठवली जाईल.

दरम्यान, आपल्या पॅन अप्लिकेशनचा स्टेटस तपासाण्यासाठी एक्नॉलेजमेंट नंबर आवश्यक असतो. त्यासाठी 'Instant PAN through Aadhaar' पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर 'Check Status of PAN' वर जा. त्यानंतर साईटवर सांगितलेल्या योग्य ठिकाणी आधार क्रमांक सबमीट करा. आधार क्रमांकाशी जोडल्या गेलेल्या मोबाईल क्रमांकावर एक OTP येईल. तोस सबमिट करा आणि आपले पॅन स्टेटस तपासा.