Tejas Sleeper Coaches: भारतीय रेल्वे 15 फेब्रुवारीपासून स्पेशल तेजस स्लीपर कोच सुरू करणार; पुढील आर्थिक वर्षात 500 कोच निर्माण करण्याचे लक्ष्य
Tejas Sleeper Coaches (PC - Twitter)

Tejas Sleeper Coaches: भारतीय रेल्वे (Indian Railways) 15 फेब्रुवारीपासून तेजस स्लीपर प्रकारच्या गाड्या सुरू करणार आहे. रेल्वेने अगरतला-आनंद विहार टर्मिनल विशेष राजधानी एक्सप्रेसमध्ये आधुनिक सुविधांसह तेजस स्लीपर कोच बसविण्याचा निर्णय घेतला आहे. या ट्रेनमध्ये राष्ट्रीय राजधानीसह अधिक चांगला संपर्क स्थापित होण्यास मदत होणार आहे. भारतीय रेल्वेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्मार्ट सुविधांसह तेजस रेल्वे प्रकारातील हे नवीन स्लीपर कोच प्रवाशांसाठी सोयीस्कर ठरतील. तेजस सेवा 15 फेब्रुवारीपासून सुरू करण्याचे नियोजन आहे.

रेल्वे विभागाने सांगितले की, प्रदीर्घ प्रवासासाठी आधुनिक तेजस स्लीपर प्रकारच्या ट्रेनची सुरूवात करून भारतीय रेल्वे प्रवाशांच्या प्रवासाच्या अनुभवात मोठा बदल घडवून आणत आहे. चालू आर्थिक वर्षात भारतीय रेल्वेने इकाइयों इंटीग्रल कोच फॅक्टरी (आयसीएफ) आणि मॉडर्न कोच फॅक्टरी (एमसीएफ) मध्ये 500 तेजस प्रकारच्या स्लीपर कोच तयार करण्याचे नियोजन केले आहे. ज्यानंतर ही सुविधा लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्येदेखील सुरू करण्यात येईल. (वाचा - IRCTC Gift For Pilgrims: 'या' धार्मिक स्थळांना भेट देण झालं सोयीस्कर; IRCTC यात्रेकरूंसाठी चालवणार 4 स्पेशन ट्रेन)

तेजस प्रकारच्या कोचचे सर्व प्रवेशद्वार स्वयंचलित आहेत. जे ट्रेनच्या रक्षकाद्वारे नियंत्रित केले जातील. जोपर्यंत सर्व दरवाजे व्यवस्थित बंद होत नाहीत, तोपर्यंत ही रेल्वे रेल्वे स्थानकातून सुरू होणार नाही. त्यामध्ये बायो व्हॅक्यूम टॉयलेट बसविण्यात आले आहे. तसेच या सर्व कोचमध्ये प्रवाशांना माहिती देण्यासाठी सेंट्रलाइज्ड पॅसेंजर इन्फॉरमेशन कोच कंप्यूटिंग युनिट असेल.

या तेजस प्रकारच्या कोचमध्ये स्वयंचलित फायर अलार्म आणि डिटेक्शन सिस्टम बसविण्यात आले आहे. सर्व प्रवाशांना वाचन करण्यासाठी कोचमध्ये बर्थ रीडिंग लाइट बसविण्यात आले आहे. त्याचवेळी कोचमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत, ज्यांच्या फोटोची गुणवत्ता रात्रीच्या वेळेस अधिक चांगली आहे.