Income Tax Return: खुशखबर! आयकर भरण्याची मुदत वाढली; अनेक करदात्यांना दिलासा, जाणून घ्या नवी तारीख
Income Tax | Representational Image | (Photo Credits: File Image)

गेल्या काही वर्षांपासून आयकर नियमांच्या बाबतीत सरकार अतिशय काटेकोर असलेले दिसून येत आहे. त्यामुळे वेळेत आयकर भरण्यासाठी (Income Tax Return) सर्वांचीच तारांबळ उडते. सरकारने 31 जुलै ही आयकर भरण्याची अंतिम तारीख सांगितली होती. मात्र कर भरण्यात येत असलेल्या अडचणी पाहून ही मुदत वाढवून 30 ऑगस्ट करण्यात आली आहे काळ संध्याकाळी आयकर विभागाने याबाबत ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. या निर्णयामुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे.

यावर्षी सीबीडीटीने (CBDT) टीडीएस रिटर्न फाइल करण्याची शेवटची तारीख 31 मे वरून 30 जून केली होती. त्यानंतर फॉर्म 16 जारी करण्याची तारीख 15 जून बदलून ती मुदत 31 जुलैपर्यंत वाढवली. बरेच लोक आपला आयटीआर भरण्यासाठी फॉर्म 16 ची  प्रतीक्षा करत होते. आता आयटी रिटर्न्स भरताना करदात्यांना त्यांच्या जीएसटीची माहिती देणे बंधनकारक असणार आहे. आर्थिक वर्ष 2017-2018 मध्ये 3 महिने व्हॅट कायदा आणि 9 महिने जीएसटी कायदा लागू होता. (हेही वाचा: खुशखबर! Income Tax Return रिफंड प्रक्रीया आता एका दिवसात होणार)

वेळेत आयटी रिटर्न्स भरला नाह्गी तर दंड –

मुदत वाढल्याने आता तुम्ही 31 ऑगस्ट ते 31 डिसेंबर 2019 पर्यंत आयटी रिटर्न्स भरलात तर तुम्हाला 5 हजार रुपये दंड भरावा लागेल. तुम्ही 1 जानेवारी 2020 ते 30 मार्च 2020 पर्यंत रिटर्न भरलात, तर तुम्हाला 10 हजार रुपये दंड भरावा लागेल.

5 लाखांपेक्षा कमी  वार्षिक उत्पन्न असलेले लोक जर का 31 मार्च 2020 पर्यंत आयटी रिटर्न्स भरत असतील, तर त्यांना 1 हजार इतका दंड भरावा लागेल.