Aadhar Card (PC - PTI)

How To Download Digital Copy Of Aadhar Card: देशातील कोणत्याही नागरिकांना विविध योजनांचा आणि विविध सेवांचा लाभ मिळण्यासाठी आधार कार्ड (Aadhar Card) आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येकाकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे. अशा परिस्थितीत, जर आपले आधार कार्ड हरवले असेल, तर टेन्सन घेऊ नका. आपण अगदी सोप्पी प्रक्रिया पूर्ण करून काही मिनिटांत आपल्या आधार कार्डची डिजिटल प्रत मिळवू शकता. यूनिक आइडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) आधार कार्ड धारकांना आणि त्यासाठी नोंदणी करणाऱ्यांना डिजिटल प्रत डाउनलोड करण्याची सुविधा देत आहे.

आपले आधार कार्ड हरवले असेल, तर आपण काही शुल्क भरून पुन्हा यूआयडीएआयच्या वेबसाइटवर आधार कार्डची प्रिंट मागू शकता. ज्यांचे आधार कार्ड हरवले, फाटले किंवा चोरी गेले आहे, अशा व्यक्तींसाठी ही सेवा खूपचं उपयुक्त ठरू शकते. आपण यूआयडीएआयच्या वेबसाइटवरून 50 रुपये शुल्क भरून आधार कार्ड पुन्हा प्रिंट करण्यासाठी अर्ज करू शकता. आधार कार्डची डिजिटल प्रिंट प्राप्त करण्यासाठी खालील पद्धतींचा अवलंब करा. (हेही वाचा - राज्य शासनाच्या रोजगारासंबंधी योजनांचा लाभ घेण्यासाठी 31 ऑगस्ट 2020 पर्यंत आधार कार्ड ऑनलाइन लिंक करण्याचे आवाहन)

How To Download Digital Copy Of Aadhar Card -

  • सर्वप्रथम यूआयडीएआयच्या आधार जारी करणार्‍या संस्थेच्या वेबसाइटवर लॉग इन करा. यासाठी
  • तुम्ही www.uidai.gov.in. या लिंकवर क्लिक करू शकता.
  • आता ‘Get Aadhaar’ विभागाअंतर्गत ‘Download Aadhaar’ या दुव्यावर क्लिक करा.
  • ‘Download Aadhaar’ वर क्लिक केल्यानंतर नवीन पृष्ठ उघडेल.
  • या पृष्ठावरील, आपण आधार क्रमांक (यूआयडी), नोंदणी क्रमांक (ईआयडी) किंवा Virtual Number (व्हीआयडी) प्रविष्ट करू शकता.
  • आता तुम्हाला कोड प्रविष्ट करावा लागेल. यासाठी ‘Send OTP’ या पर्यायावर क्लिक करा.
  • आता आपल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर 6-अंकी ओटीपी उपलब्ध होईल.
  • हा ओटीपी प्रविष्ट केल्यानंतर तुम्हाला तेथे Verify आणि Download या पर्यायावर क्लिक करा.

यानंतर तुमच्या आधार कार्डची डिजिटल कॉपी डाउनलोड केली जाईल आणि तुम्ही दिलेल्या पत्यावर आधर कार्ड पोस्टाने पाठवे जाईल. जर आपण आधार कार्ड प्रिंट करण्यासाठी अर्ज केला असेल मात्र, तुम्हाला याची प्रिंट मिळाली नसेल, तर तुम्ही त्याची स्थिती देखील तपासू शकता.