IB Recruitment 2023: इंटेलिजंस ब्युरोमध्ये 677 जागांवर नोकरीची संधी; mha.gov.in वर करा अर्ज
Government Jobs 2023 | (File Photo)

गृह मंत्रालयाकडून इंटेलिजंस ब्युरोमध्ये (Intelligence Bureau) नोकरीची संधी आहे. आज 14 ऑक्टोबर पासून या नोकरभरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार 13 नोव्हेंबर पर्यंत या नोकरभरती मध्ये सहभागी होत अर्ज करू शकणार आहेत. आय बी मध्ये एकूण 677 जागांवर नोकर भरती जाहीर करण्यात आली असून 362 जागा या सिक्युरिटी असिस्टंट/मोटर ट्रान्सपोर्ट या पदासाठी आहेत. तर 315 जागा या एमटीएस पदासाठी आहेत.

उमेदवारांची निवड परीक्षेवर होणार आहे. निवड प्रक्रियेमध्ये टियर 1 (ऑब्जेक्टिव्ह), टियर 2 (वर्णनात्मक), स्थानिक भाषा चाचणी (Security Assistant साठी) आणि मुलाखत यांचा समावेश होतो. SA/MT पदांसाठी गुणवत्ता यादी टियर-1 आणि टियर-2 परीक्षांमधील एकत्रित गुणांवर आधारित असेल. इथे पहा नोटिफिकेशन .

कसा कराल अर्ज?

  • उमेदवारांना mha.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. होमपेजवर असणाऱ्या IB या पर्यायावर क्लिक करा.
  • यानंतर नवीन पेजवर स्वतःला रजिस्टर करुन, लॉगइन आयडी आणि पासवर्ड जनरेट करा.
  • लॉगइन केल्यानंतर अर्जामध्ये माहिती भरा.
  • त्यानंतर आपला फोटो, सही आणि इतर डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • अर्जाचे शुल्क भरून तुम्ही फॉर्म सबमिट करा.

आयबी मधील ही अर्ज प्रक्रिया सशुल्क आहे. ओपन/ओबीसी/ईडब्ल्यूएस या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 500 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. तर, एससी/एसटी/पीडब्ल्यूडी आणि महिला उमेदवारांसाठी 50 रुपये शुल्क असणार आहे. 13 नोव्हेंबर नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

SA पदांसाठी वयोमर्यादा शेवटच्या तारखेला 27 वर्षांपेक्षा जास्त नसावी आणि MTS/Gen साठी 18-25 वर्षे आहे. उच्च वयोमर्यादा SC/ST आणि OBC उमेदवारांसाठी तसेच तीन वर्षे नियमित आणि सतत सेवा असलेल्या विभागीय उमेदवारांसाठी शिथिल आहे. Additional age relaxation विशिष्ट श्रेणींना लागू असेल.