How To Vote #India: मतदान कसे करावे #भारत, हे सांगणारं गुगलचं खास डुडल
How To Vote #India? (Photo Credits- Google)

How To Vote #India Google Doodle: आज देशासह राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला (3rd Phase Voting) आज सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. 11 एप्रिलपासून देशात लोकसभा निवडणूक 2019 (Loksabha Elections 2019) साठीच्या मतदानासाठी सुरुवात झाली असून देशात 7 तर राज्यात 4 टप्प्यात मतदानाची प्रक्रीया पार पडणार आहे. यानिमित्ताने गुगलने खास डुडल साकारले आहे. मतदान केल्यानंतर शाई लावलेले बोट दाखवून मतदानाची संपूर्ण प्रक्रीया समजावून सांगण्यात आली आहे.

गुगलने डुडल साकारुन नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर मतदान करण्याची प्रक्रीयाही समजावून सांगितली आहे.

तिसऱ्या टप्प्यात देशातील गुजरात, गोवा, कर्नाटक, आसाम, छत्तीसगड, दादरा नगर हवेली आणि दमण-दीव या राज्यातील एकूण 117 मतदारसंघात मतदान होणार असून महाराष्ट्रातील 14 मतदारसंघात मतदानाची प्रक्रीया पार पडणार आहे. 23 मे रोजी मतमोजणी होणार असून या दिवशी जनतेचा कौल लक्षात येईल.

कसं कराल मतदान हे दाखवणारा  व्हिडिओ:

गुगल नेहमीच सणवार, उत्सव, थोरामोठ्यांची जयंती-पुण्यतिथी निमित्त डुडल साकारत असतो. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यातील मतदानादिवशीही गुगलने डुडल साकारले होते. आता पुन्हा एकदा तिसऱ्या टप्प्यातील मतदानाचा उत्साह डुडलवर दिसून येत आहे.