IRCTC कडून Online Ticket Booking च्या प्रक्रियेमध्ये बदल; पहा आता कसं बूक कराल तिकीट
Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: File Photo)

IRCTC ने ऑनलाईन तिकीट बुकिंगची प्रक्रिया अपडेट केली आहे. आता आयआरसीटीसी वरून तिकीट बूक करण्यापूर्वी प्रवाशाला आपला मोबाईल नंबर आणि इमेल आयडी व्हेरिफाईड करावा लागणार आहे. IRCTC ची वेबसाईट किंवा अ‍ॅप द्वारा तिकीट बुकिंग करताना हे व्हेरिफिकेशन करावं लागणार आहे.

आयआरसीटीसी ने आता युजरला आता मोबाईल नंबर आणि इमेल आयडी व्हेरिफाईड केल्याशिवाय तिकीट बूक करता येणार नाही. मग जाणून घ्या कशाप्रकारे कराल मोबाईल नंबर आणि इमेल आयडी व्हेरिफाईड?

मोबाईल नंबर आणि इमेल आयडी व्हेरिफाईड करण्यासाठी -

 • IRCTC website किंवा app ला भेट द्या.
 • लॉगिन आयडी आणि पासवर्डने लॉगिन करा.
 • आता व्हेरिफिकेशन विंडो वर या
 • तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर आणि इमेल आयडी टाका.
 • आता तुम्हांला स्क्रिनवर उजव्या बाजूला व्हेरिफिकेशनचा पर्याय दिसेल आणि डाव्या बाजूला एडीटचा पर्याय दिसेल.
 • तुम्हांला डिटेल्स टाकल्यानंतर एक OTP येईल. तो सबमीट करा.

व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हांला आता पूर्वीप्रमाणेच तिकीट बूक करता येणार आहे. हे व्हेरिफिकेशन केवळ एकदाच करायचे आहे. नक्की वाचा: Book Now Pay Later: रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! आता प्रवासी आधी प्रवास करून नंतर भरू शकतात भाडे; 'असा' घ्या या सुविधेचा लाभ .

ऑनलाईन तिकीट बुकिंग कसं कराल?

 • व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अकाऊंटमध्ये पुन्हा होम पेज वर या.
 • प्रवासाचे सारे डिटेल्स ज्यामध्ये तारीख, कुठून कुठे प्रवास करायचा आहे? क्लास, तिकीटाचा प्रकार निवडा.
 • त्यानंतर रेल्वेकडून तुमच्या प्रवासाच्या दिवसाच्या उपलब्ध ट्रेन्सची यादी देईल.
 • आता या यादीमधून तुम्हांला ज्या ट्रेनने प्रवास करायचा आहे ती निवडा.
 • तिकीट उपलब्ध असतील तर 'बूक नाऊ' निवडा.
 • आता प्रवाशांचे डिटेल्स टाका. त्याचा प्रिव्ह्यू पाहून पेमेंट मोड निवडा.
 • ऑनलाईन तिकीटाचे पैसे दिल्यानंतर तुमचं तिकीट बूक होईल.

बूक झालेल्या तिकीटाची माहिती आता तुमच्या मोबाईल आणि इमेल आयडी वर देखील दिली जाईल. सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू असल्याने अनेकांचे विकेंडस किंवा मोठ्या सुट्ट्यांसाठी  प्लॅन्स सुरू आहेत. यंदा रेल्वे कडून प्रवाशांचा बाहेर पडण्याचा उत्साह पाहून काही समर स्पेशल ट्रेन्स देखील सोडण्यात आल्या आहेत.