Book Now Pay Later: रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! आता प्रवासी आधी प्रवास करून नंतर भरू शकतात भाडे; 'असा' घ्या या सुविधेचा लाभ
Representational Image (Photo Credits: PTI)

Book Now Pay Later: रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी एक आनंदाची बातमी आहे. आता तुमच्याकडे पैसे नसले तरी तुम्ही ट्रेनचे तिकीट बुक करू शकता आणि नंतर पैसे देऊ शकता. होय, हे खरे आहे कारण पेटीएम तुम्हाला ही सुविधा देत आहे. खरेतर, पेटीएम पेमेंट गेटवे (Paytm PG) वापरकर्ते आता प्लॅटफॉर्मवर पेटीएम पोस्टपेड लाँच करून IRCTC तिकीट सेवेवर 'आता बुक करा, नंतर पैसे द्या' या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. म्हणजेच, पेटीएम पोस्टपेड वापरकर्ते नंतर रक्कम भरण्याचा पर्याय निवडून त्यांची तिकिटे IRCTC द्वारे बुक करू शकतील. ही सुविधा शेकडो लोकांसाठी वरदान ठरू शकते. कारण, वापरकर्ते तत्काळ पैसे न भरता रेल्वे तिकीट बुक करू शकतील.

कंपनीने म्हटले आहे की, वापरकर्त्यांनी 'आता खरेदी करा, नंतर पैसे द्या' या सुविधेला चांगला प्रतिसाद दिला आहे. या सुविधेमुळे तिकीट बुक करणे, बिले भरणे किंवा खरेदी करणे जास्त सोप झालं आहे. यामुळे ग्राहकांना एकप्रकारची आर्थिक मदत होते. वापरकर्ते किरकोळ दुकाने आणि वेबसाइट्सवर उत्पादन आणि सेवांच्या विस्तृत श्रेणीसाठी या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. (हेही वाचा - PAN-Aadhaar Linking Deadline Extended: पॅन-आधार लिंक करण्याच्या अंतिम मुदतीत वाढ; मात्र, 1 एप्रिल पासून 'या' कामासाठी द्यावे लागणार 500 रुपये)

दरम्यान, Paytm पोस्टपेड 30 दिवसांपर्यंतच्या कालावधीसाठी ₹ 60000 पर्यंतचे व्याजमुक्त क्रेडिट ऑफर करते आणि वापरकर्त्यांना त्यांच्या सर्व क्रेडिट-आधारित खर्चाचा मागोवा ठेवण्यासाठी मासिक बिल दिले जाते. वापरकर्ते बिलिंग सायकलच्या शेवटी संपूर्ण रक्कम भरू शकतात किंवा सोयीस्कर पेमेंटसाठी त्यांचे बिल ईएमआयमध्ये रूपांतरित करू शकतात.

IRCTC तिकीट बुकिंगसाठी पेटीएम पोस्टपेड (बीएनपीएल) कसे वापरावे:

  • IRCTC वर जा, तुमचा प्रवास तपशील अंतिम करा आणि पेमेंट विभागात ' 'Pay Later' निवडा
  • पेटीएम पोस्टपेड वर क्लिक करा.
  • पेटीएम क्रेडेंशियल्स वापरून लॉग इन करा आणि ओटीपी प्रविष्ट करा. या प्रकारे तुम्ही तुमचे तिकिट बुक करू शकता.

पेटीएम पेमेंट सर्व्हिसेस लिमिटेडचे ​​सीईओ प्रवीण शर्मा म्हणाले, “आम्ही वापरकर्त्यांना अखंड डिजिटल पेमेंट्स आणि वित्तीय सेवा सक्षम करण्यासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानावर आधारित उपाय ऑफर करण्याचा प्रयत्न करतो. पेटीएम पोस्टपेड (BNPL) आता IRCTC द्वारे रेल्वे तिकीट बुक करू इच्छिणाऱ्या वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असेल. IRCTC सह भागीदारीद्वारे, Paytm PG वापरकर्त्यांना तत्काळ तिकीट बुकिंगसाठी नंतर पैसे देण्याच्या पर्यायासह अखंड आणि सुरक्षित डिजिटल पेमेंट ऑफर करण्याची आशा आहे."