PAN-Aadhaar Linking Deadline Extended: ज्या नागरिकांनी अद्याप आपले पॅन कार्ड आधारशी लिंक केलेले नाही, त्यांच्यासाठी एक चांगली आणि वाईट बातमी आहे. चांगली बातमी म्हणजे सरकारने आता पॅन-आधार लिंक करण्याची अंतिम मुदत वाढवली आहे. मात्र, त्याचबरोबर एक अटही घातली आहे, जी नागरिकांच्या खिशाला भारी पडणार आहे. आज दिवसाच्या अखेरीस तुम्ही तुमचा पॅन तुमच्या आधार क्रमांकाशी लिंक केला नाही तरीही, तुमचा पॅन 31 मार्च 2023 पर्यंत कार्यरत राहील. म्हणजे तुमचे पॅन कार्ड सरकारने यापूर्वी अधिसूचित केल्याप्रमाणे निष्क्रिय होणार नाही.
वास्तविक तुमचा पॅन आधारशी लिंक न करता ते ऑपरेटिव्ह ठेवण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2022 च्या आधीच्या मुदतीपासून 31 मार्च 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे. तथापि, 1 एप्रिल 2022 पासून पॅन-आधार लिंक करण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागणार आहेत. (हेही वाचा - PAN-Aadhaar Linking Deadline: आधार-पॅन लिकिंगचा आज शेवटचा दिवस; इथे जाणून घ्या तुमची कार्ड्स जोडलेली आहेत की नाही?)
दरम्यान, आतापर्यंत तुम्ही पॅन-आधार लिंक केले नसेल, तर आता तुम्हाला हे काम करण्यासाठी पूर्ण वर्ष मिळणार आहे. सरकारने पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2023 पर्यंत वाढवली आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT), आयकर विभागाची (Income Tax Department) सर्वोच्च धोरण बनवणाऱ्या संस्थेने पॅन-आधार लिंक करण्याची अंतिम तारीख वाढवण्याची अधिसूचना जारी केली आहे. याआधीही सरकारने पॅन-आधार लिंक करण्याची मुदत 3 वेळा वाढवली आहे.
CBDT ने पॅन कार्डसोबत आधार लिंक करण्याची शेवटची तारीख वाढवली आहे. मात्र, आधार-पॅन लिंक करण्याच्या कामासाठी 500 रुपये शुल्कही लागू केले आहे. तर आतापर्यंत हे काम मोफत होत होते. म्हणजेच 31 मार्च 2022 पर्यंत आधार-पॅन लिंक झाले नाही तरी पुढील एक वर्ष कोणत्याही अडचणीशिवाय पॅन कार्ड काम करत राहील. पण दरम्यान, आधार-पॅन लिंक करण्यासाठी तुम्हाला 500 रुपये द्यावे लागणार आहेत.
या नवीन अटीनुसार, 1 एप्रिल 2022 ते 30 जून 2022 दरम्यान, तुमचा पॅन-आधार लिंक करण्यासाठी 500 रुपये शुल्क भरावे लागेल आणि त्यानंतर या कामासाठी 1,000 रुपये शुल्क भरावे लागेल.