प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Facebook//UIDAI)

आधारकार्ड (Aadhaar Card) हा आजकाल आपल्या प्रत्येक लहान मोठ्या कामांमध्ये महत्त्वाचं कागदपत्र म्हणून काम करत आहे. ओळखपत्राचा दाखला म्हणून त्याकडे पाहिलं जातं. हेच पाहता आता नागरिकांसाठी UIDAI ने आता Aadhaar PVC Service सुरू केली आहे. यामध्ये तुम्हांला पीव्हीसी आधार कार्ड ( Aadhaar PVC Card) उपलब्ध करून दिले जाते. याकरिता तुम्हांला ऑफिशिअल वेबसाईट वर केवळ अप्लाय करायचं आहे.

UIDAI च्या नोटिफिकेशननुसार, आता पीव्हीसी कार्ड तुम्ही केवळ एक मोबाईल नंबर वापरून संपूर्ण कुटुंबासाठी मागवू शकता. तुम्ही कोणताही मोबाईल नंबर ओटीपी मिळवण्यासाठी वापरू शकता. याकरिता आता रजिस्टर मोबाईल नंबर बंधनकारक नसेल. म्हणजे आता कोणाच्याही एका सदस्याच्या मोबाईल नंबर वरून सार्‍यांसाठी पीव्हीसी कार्ड घेऊ शकता. या सेवेसाठी प्रत्येक पीव्हीसी कार्डला 50 रूपये आकारले जाणार आहेत. ट्वीट करत देखील या नव्या सुविधेची माहिती देण्यात आली आहे. हे देखील नक्की वाचा: Aadhaar Letter, eAadhaar, mAadhaar आणि Aadhaar PVC Card मध्ये नेमका फरक काय? जाणून घ्या.

ट्वीट

नॉन रजिस्टर मोबाईल नंबर वापरून कसं ऑर्डर कराल Aadhaar PVC Card?

  • uidai.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • “Order Aadhaar PVC Card” वर क्लिक करा. त्यानंतर तुमचा 12 अंकी आधार नंबर टाका किंवा 28 अंकी Enrollment ID टाका.
  • सिक्युरिटी कोड टाका आणि नंतर “If you do not have a registered mobile number, please check in the box”.च्या चेक बॉक्सला निवडा.
  • नॉन रजिस्टर किंवा पर्यायी मोबाईल नंबर टाका आणि “Send OTP”ला क्लिक करा.
  • “Terms and Conditions”समोरील चेक बॉक्स सिलेक्ट करा.
  • सबमीट वर क्लिक करा. ओटीपी व्हेरिफिकेशन निवडा.
  • त्यानंतर 'मेक पेमेंट'चा पर्याय निवडा. आता तुम्ही पेमेंट साठी रिडिरेक्ट व्हाल. तिथे क्रेडिटकार्ड, डेबिट कार्ड, यूपीआय, नेट बॅंकिंगचा पर्याय दिसेल.
  • पेमेंट झाल्यानंतर डिजिटल साईन असलेली एक रिसिट दिसेल.ती पीडीएफ स्वरूपात तुम्ही डाऊनलोड करू शकाल. तुम्हांला सर्व्हिस रिक्वेस्ट नंबर एसएमएस द्वारा देखील मिळेल.
  • तुम्हांला status of SRN ट्रॅक करण्याची सोय आहे. तुमच्या एसएमएस मध्येच AWB number असेल. त्याद्वारा कार्ड तुमच्या घरी येई पर्यंत ट्रॅक करू शकाल.

नवीन आधार पीव्हीसी कार्ड एटीएम किंवा डेबिट कार्डसारख्या आकाराचे आहे, जे तुम्ही सहजपणे आपल्या पर्समध्ये ठेवू शकता.