पॅनकार्डला आधार कार्ड करा लिंक; अगदी सोप्या पद्धतीने
आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करणे झाले सोपे..

मुंबई: काय सांगता? तुम्ही अद्याप तुमचे पॅन कार्ड आधार कार्डला लिंक केले नाही? ठिक आहे. मुळीच चिंता करू नका. फक्त हा सोपा मार्ग अवलंबा. ज्यामुळे तुमचे पॅनकार्ड होईल आधार कार्डशी लिंक. महत्त्वाचे म्हणजे हा मार्ग इतका सोपा आहे की, तुम्ही घरबसल्याही त्याचा वापर करू शकता. त्यासाठी तुम्हाला केवळ एक मेसेज करावा लागेल. घ्या जाणून...

मेसेज कुठे पाठवाल?

कदाचित तुम्हाला माहिती नसेल. आयकर विभागाने PAN कार्ड (permanent account number)आधार कार्डला जोडण्यासाठी SMS सेवा सुरू केली आहे. या सेवेच्या माध्यमातून ज्या व्यक्तिला आपले PAN आधारशी जोडायचे आहे. त्या व्यक्तिने आपल्या मोबाईलमधून UIDPAN असे टाईप करून स्पेस द्यायचा आहे. त्यानंतर आपला PAN नंबर टाईप करून तो मेसेज 567678 किंवा 56161 या क्रमांकावर पाठवायचा आहे.

OTPचा वापर करा

दरम्यान, ध्यानात ठेवा की, जो पहिला १२ अंकी क्रमांक आहे तो आपला आधार क्रमांक आहे. तर, दुसरा आपला PAN कार्ड क्रमांक आहे. उदाहराणार्थ: (UIDPN -space- Aadhar no xxxxxx87. Pan no.xxxx100). जर आपल्या पॅन कार्ड किंवा आधार कार्डवरील नावात काही बदल असेल तर, आपल्याला SMS च्या माध्यमातून एक OTP येईल. त्यानंतर हा OTP टाकताच आपले आधार आणि पॅन कार्ड क्रमांक एकमेकांशी लिंक होतील.

आधार, पॅनकार्डवरील तपशील कसा दुरूस्त कराल?

दरम्यान, PAN ला आधार कार्ड लिंक करताना जन्म तारिख जर चुकीची असेल तर, ती आगोदर योग्य करून घ्यावी लागेल. पॅन कार्डवरच्या तपशीलामध्ये काही त्रूटी असेल तर, ती दूर करण्यासाठी आपल्याला National Security Depository Limited च्या वेबसाईटवर (https://www.nsdl.co.in/) जावे लागेल. तर, आधार कार्डवरील तपशीलात दुरूस्ती करण्यासाठी तुम्हाला UIDAI च्या पोर्टलवर जावे लागेल.